मोठी बातमी ! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?ज्येष्ठ नेत्यांने सगळंच सांगितलं..

NEWS PRAHAR : उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनी ‘महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते मी करेन’ असे ठणकावून सांगत राज ठाकरेंसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. यावरुन महापालिका निवडणुकांआधी शिवसेना पुन्हा अखंडित होणार का? अशी … Read more

लोणावळा खंडाळा परिसरामध्ये श्रीमंतांच्या उधळपट्टीसाठी क्लबच्या नावाखाली चालतोय थोरवेंचा जुगार…

NEWS PRAHAR  सुचिता भोसले  ( पुणे ) : लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांना प्रशासकीय API लाड साहेबांच्या  वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मात्र, या अवैध व्यावसायांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.लोणावळा परिसरात अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.  पत्त्यांच्या जुगाराने सध्या जोर धरलेला दिसून येत … Read more

एक दिवस तलवारीने तोडतो…!नेरेच्या सरपंचाला भर ग्रामसभेत जीवे मारण्याची धमकी..

NEWS PRAHAR ( हिंजवडी ) – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्या पाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला हे प्रकरणे ताजे असतानाच आयटी पार्क हिंजवडी परिसरातील नेरे-दत्तवाडी गावच्या सरपंचांना भर ग्रामसभेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, ‘तुला एक ना एक दिवस तलवारीने तोडतो’ अशी जीवे मारण्याची धमकी … Read more

शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत…

NEWS PRAHAR ( बारामती ) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसरीकडे आता शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार  यांच्या प्रचारसभे मध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला … Read more

संजय वर्मांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती….

NEWS PRAHAR ( मुंबई ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेससह इतर पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली होती. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आता राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस … Read more

निवडणूक आयोगाने केली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी…

NEWS PRAHAR  ( मुंबई ) : विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतं आहे.

अमिताभ बच्चन यांनी केले “एका रात्रीची बाई” चे पोस्टर ट्विट.

NEWS PRAHAR : नुकतंच एका मराठी सिनेमाच्या शिर्षकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे व त्याचे कारण आहे भारतीय चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन. आश्चर्य वाटलं ना? भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महानायकाने त्याच्या एक्स अकाउंटवरून एका मराठी चित्रपटाचे थेट पोस्टर टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्याचं आश्चर्य तर वाटणारच ना! बरं चित्रपटाचं नाव सुद्धा उत्सुकता वाढवणारं “एका रात्रीची … Read more

विधानसभेतून माघार घेईन अन् माझी जागा महायुतीला देईल ; बच्चू कडूंनी स्पष्ट सांगितलं..

NEWS PRAHAR ( छत्रपती संभाजीनगर ) : ‘‘सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार. आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर माझीही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी … Read more