जेजुरीत मटक्याचा ‘T-20’ सामना; बुकींची धावसंख्या वाढतेय, पोलिसांना विकेट सापडेना!

जेजुरी । प्रतिनिधी : देवाच्या भंडाऱ्याने पिवळीधमक होणाऱ्या ऐतिहासिक जेजुरी नगरीत सध्या भलताच ‘खेळ‘ रंगला आहे. खंडोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक जेजुरीत येतात; पण याच पावन भूमीत आडोशाला ‘मटक्याचा टी-२०’ (Satta Matka) सामना जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिक उघडपणे करू लागले आहेत. क्रिकेटच्या टी-२० सामन्यासारखाच हा मटका बाजारही दर तासाला आपला पॅटर्न बदलत … Read more

लाच घेताना पकडला, आता बेहिशोबी मालमत्तेत अडकला; ढेकळे दांपत्यावर गुन्हा…

बारामती। प्रतिनिधी  बारामतीत लाचखोरीत अडकलेल्या नगररचना अधिकाऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता अधिकाऱ्यासह पत्नीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; २ कोटी ७८ लाख ४१ हजार ४४२ रुपयांची मालमत्ता आढळली नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार म्हणून कार्यरत असलेल्या आणि बारामतीत लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या विकास किसन ढेकळे या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

हिंजवडीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट: PI बालाजी पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यूज प्रहार’च्या संपादिकांकडून शुभेच्छा…

हिंजवडीतील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’; लेट नाईट क्लब व देहव्यापाराविरोधात कारवाईचे संकेत… हिंजवडी । प्रतिनिधी : दिनेश परमार हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) बालाजी पांढरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यूज प्रहार’च्या संपादिका सुचिता हरपळे ( भोसले ) यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी झोन-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव साहेब यांचीही भेट झाली. … Read more

खराडीत पहाटे ४ पर्यंत पब सुरू असल्याची चर्चा; पोलीस-उत्पादन शुल्क विभागावर प्रश्नचिन्ह!CP साहेबांच्या आदेशाला खराडी पोलिसांचा ‘ब्रेक’ का?

CP साहेबांच्या आदेशाला खराडी पोलीस घाबरत नाहीत का? लेट नाईट पबवर कारवाईचा अभाव; उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह — स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल पहाटे ४ वाजेपर्यंत आस्थापना सुरू असल्याचा दावा; नियमभंग होत असल्यास कारवाई कधी? खराडी | प्रतिनिधी : यश तांबोळकर  पुणे शहरातील खराडी परिसरात काही पब व बार निर्धारित वेळेनंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी … Read more

मिशन क्रॅकडाऊनची धडक कारवाई! नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त; दोघांना अटक…

वाघोली, पुणे : पुणे पोलिसांच्या मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत झोन ७ मधील वाघोली पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आय.व्ही. इस्टेट रोड, ऑर्चिड साई प्रॉपर्टीज, वाघोली परिसरात सापळा रचून पोलिसांनी सूरज पद्माकर भुते (वय १९) … Read more

दौंड परिसरातील सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक; कंपनी तात्काळ बंद करण्याची मागणी..

दौंड | प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील एका सिमेंट कंपनीमधून मोठ्या प्रमाणात सिमेंटची धूळ उत्सर्जित होत असल्याने परिसरातील शेतीचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, दौंड शहरचे अध्यक्ष गणेश मनोहर जगताप यांनी संबंधित कंपनीविरोधात तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे सातत्याने होत असलेले नुकसान लक्षात घेता कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी, … Read more

बार कौन्सिल 2026 विजयी उमेदवारांचा भारतीय पत्रकार संघ लीगल विंगकडून गौरव…

NEWS PRAHAR ( पुणे )  दि : १७ जुन : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे भारतीय पत्रकार संघ लीगल विंग महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुण्यात अभिनंदन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या निवडणुकीत संपूर्ण राज्यभरातून अंदाजे 2 लाखांहून अधिक ॲडव्होकेट मतदारांनी सहभाग घेतला होता. … Read more

भोगवटा वर्ग २ जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरप्रकार? प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी…

NEWS PRAHAR ( पुणे )  दि : ०४ मे : हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी येथील भोगवटा वर्ग २ जमिनीच्या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित जमिनीचे हस्तांतर सक्षम सरकारी अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नसताना, नियमांना बगल देत बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार नोंदवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रभारी म्हणून कार्यरत … Read more