वाघोलीत CAFE SUNSET मध्ये मिळणाऱ्या गुडगुडीला कोणाचे अभय….?

  NEWS PRAHAR ( PUNE ) : राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातलेली असताना शासनाच्या आदेशाचे तीन तेरा वाजवून व कोणालाही न घाबरतां मालक आणि पोलीस यांच्या संगणमताने वाघोलीतील बकुरी फाटा येथील कॅफे सनसेट मध्ये हुक्का पार्लर सुरू आहे. हूक्का पार्लरमध्ये हुक्का हा तंबाखू ,निकोटीन,गांजा आणि इतर मादक पदार्थांनी भरलेला असतो. हुक्का पार्लरचे मालक सोशल … Read more

पोलिस व अन्न पुरवठा विभागाच्या मुक संमत्तीने पुणे सोलापूर हायवे लगत गॅस माफिया सक्रिय…

पोलिस–अन्नपुरवठा आशीर्वादाने हायवे लगत गॅस माफियांचा धंदा फोफावला स्फोटाचा धोका टांगणीला, नागरिकांचा जीव धोक्यात… NEWS PRAHAR ( PUNE ) : दौंड परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेला गॅस चोरीचा धंदा नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ करतो आहे. पुणे–सोलापूर एक्सप्रेस हायवेवर पोलिस स्टेशनच्या शेजारीच अवैधरित्या ट्रक टॅबलेटमधून गॅस बाटल्यांत भरला जात असून, क्षणात भीषण स्फोट होऊन चार–पाच किलोमीटर परिसर … Read more

राज्यातील माजी मंत्री व 72 वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

NEWS PRAHAR : राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. हा राजकीय नेता सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या राजकीय नेत्याने हा गौप्यस्फोट केला. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. संबंधित नेत्याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, हनी … Read more

पैसे उकळणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन…

NEWS PRAHAR ( पुणे ) – मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारणाऱ्या तरुणास धमकावून त्याच्याकडून २० हजार रुपये उकळणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. ही घटना मंगळवारी (ता.१७) रात्री विधी महाविद्यालय परिसरात घडली होती. गणेश तात्यासाहेब देसाई, योगेश नारायण सुतार अशी निलंबन केलेल्या … Read more

शाहरुखचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना पुणे पोलीस आयुक्तां कडून १ लाख रुपयांचे बक्षीस

NEWS PRAHAR ( पुणे ) – पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या पोलिस चकमकीत मृत्यू झाला. पुणे येथील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेल्या शाहरुखवर खून, दरोडा, गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मोका अंतर्गत कारवाईनंतर तो फरार झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत सोलापूरमध्ये नातेवाईकांकडे लपून बसला होता. अशात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाला मिळालेल्या … Read more

नागरिकांचा फुरसुंगी नगर परिषदेच्या विरोधात जोरदार निषेध मोर्चा….

NEWS PRAHAR ( पुणे ) : फुरसुंगी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी शनिवारी तीव्र स्वरूपाचा निषेध मोर्चा काढला. नगर परिषद स्थापनेला एक वर्षही पूर्ण झाले नसताना नागरिकांमध्ये असंतोषाचा स्फोट झाला असून, मूलभूत गरजांपासून दूर ठेवले जात असल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले.   संकेत विहार व परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत नगर … Read more

BIG BREAKING : पुण्यातील कुंडमाळा भागात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…!

NEWS PRAHAR ( पुणे ): महाराष्ट्रातील पुण्यातील कुंडमाळा भागात इंद्रायणी नदीवर बांधलेला एक जीर्ण पूल कोसळला. पुल कोसळला तेव्हा त्यावर अनेक पर्यटक उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे नदीतील वाढलेला प्रवाह पाहण्यासाठी पर्यटक गेले होते. पूल कोसळल्याने सुमारे २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली … Read more

मोठी बातमी : कोट्यवधीची जमीन बळकावल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा कारनामा उघड झाला आहे. पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा बोगस मालक दाखवून कोट्यवधीची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजेंद्र लांडगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील चंदननगर पाठोपाठ वाघोलीमध्ये बोगस जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी … Read more

थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग…

NEWS PRAHAR : गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान काल अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेला काही तास उलटले तोच, एअर इंडियाच्या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं. हे विमान फुकेतवरून नवी दिल्लीला येत होतं. विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती आहे. या विमानातील सर्व १५६ … Read more