पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल Sufi’s मध्ये दम मारो दम कोणत्या कलेक्टर च्या आदेशाने सुरू ! कारवाई होणार का?

NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १० डिसेंबर  : कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तरीही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार परिसरातील Sufi’s हॅाटेलमध्ये … Read more

आरोपींची धिंड काढून न्याय देण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला?

NEWS PRAHAR ( पुणे ) दि : ३० नोव्हेंबर –  घरफोडी, वाहनतोडी, कोयत्याच्या जोरावर दहशत माजविणाऱ्या टोळ्यांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘खाकी पॅटर्न’ विषयी शहरात मोठी चर्चा होत आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची धिंड काढणे, भररस्त्यात गुडघ्यावर चालायला लावणे, कंबरेवर हात ठेवून उड्या मारायला लावणे किंवा आरोपींची परेड घेणे, असे प्रकार सर्रास केले जात आहेत. पोलिसांच्या या कृतींचे व्हिडीओ सोशल … Read more

पुरंदरच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ; अवैध दारूची हॅाटेल ढाब्यावर खुलेआम विक्री, उत्पादनशुल्क विभागाला पडलाय का विसर?

NEWS PRAHAR ( पुरंदर ) दि : १६ नोव्हेंबर – सासवड येथील हॅाटेल रेस्टोरंट बार व परिसरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारच्या अवैध दारूची विक्री हॅाटेल ,बार व ढाब्यावर होत असल्याने वादविवाद, भांडणतंटे वाढले असून महिलावर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उदध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे. यामुळे हॅाटेल,ढाबा,व बार मधील अवैधरित्या … Read more

कर्तव्यात कसूर केल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पुण्यात निलंबन…

NEWS PRAHAR ( पुणे ) दि : ३० ऑक्टोबर : हडपसर परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार आल्यानंतरही वेळेत टाळाटाळ करून घटनास्थळी न पोहोचल्यामुळे हडपसर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या कारवाईचे आदेश दिले असून, निलंबित कर्मचाऱ्यांची नावे मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी आहेत. हे दोघेही … Read more

फुरसुंगीकरांचा संताप : कर भरतो तरी सुविधा कुठे? रस्त्यांची दुरवस्था, नागरिक त्रस्त….

NEWS PRAHAR (HADAPSAR) दि : ३० ऑक्टोबर : फुरसुंगी गावात जाणारा मेन रोड हरपळे वस्ती ह्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे या भागातील रहिवाशांना येता- जाताना कसरत करावी लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनातील अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क करूनदेखील कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे फुरसुंगी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही कर कोणत्या सुविधांसाठी प्रशासनाकडे भरतो, हेच … Read more

प्रशासनाच्या आशिर्वादाने वाळू माफियांचा हैदोस… उरूळी कांचन येथील वाळू तस्करांवर प्रशासन कारवाई करणार का?

NEWS PRAHAR ( PUNE ) दि : २१ ऑक्टोबर : प्रशासनाच्या आशिर्वादाने उरूळी कांचन परिसरात अजूनही अनेक गावांमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि वाहतूक धोकादायक बनली आहे. ग्रामीण भागातील उरूळी कांचन गावा गावातील प्रमुख मार्गांवरून अवैध वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून येतात. त्यामुळे … Read more

काळेपडळ पोलिसांनी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेला घेतले ताब्यात….

NEWS PRAHAR ( PUNE ) दि : २० ऑक्टोबर : काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील लावण्य हॉटेल जवळील ब्रिजचे खाली नाल्यामध्ये अवैध हातभट्टी दारू विक्री करणारी महिला नामे सौ.रेखा विजय काळकर ,वय ५० वर्षे राहणार तरवडे वस्ती , मोहम्मद वाडी पुणे हिस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलेले असून सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड हे उध्वस्त करण्यात आले असून पुढील कार्यवाही … Read more

राजगड परिसरात गॅस रिफिलिंग, स्टील चोरी, पत्त्यांचे क्लब, मटक्याचे धंदे, या अवैध धंद्यांचा विस्फोट…!

NEWS PRAHAR ( PUNE ) दि : १७ ऑक्टोबर :  राजगड पोलीस स्टेशन परिसरात मटका ,जुगार, गांजा दारू विक्री, तसेच स्टील चोरी , गॅस चोरी ऑइल डिझेल चोरी‌ मागील काही दिवसांपासून स्थानिक पोलीस स्टेशनच्या कृपा आशीर्वादाने हा गोरख धंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलीस सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र यामुळे समोर आले आहे. … Read more

ऐन दिवाळीत राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार…!

90 बड्या अधिकाऱ्यांची होणार बदली? NEWS PRAHAR ( मुंबई ) दि : १७ ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता ऐन दिवाळीच्या धामधुमीत बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या आठवड्यात अपर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट … Read more

पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांचे खांदेपालट, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले आदेश…

NEWS PRAHAR  दि : १७ ऑक्टोबर : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. १७ पोलिस निरीक्षकांपैकी पैकी ६ जण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेत. वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची कंट्रोल आणि वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या … Read more