संजय वर्मांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती….

NEWS PRAHAR ( मुंबई ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेससह इतर पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली होती. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आता राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस … Read more

मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार…

NEWS PRAHAR ( जालना ) : मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. याआधी त्यांनी मतदारसंघांची यादी जाहीर केली होती. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये … Read more

निवडणूक आयोगाने केली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी…

NEWS PRAHAR  ( मुंबई ) : विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतं आहे.

समस्यांवर मात करत महिलांनी सक्षम व्हावे: चाफळकर…

वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शन… NEWS PRAHAR ( पुणे ) : वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे भरले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका अनघा चाफळकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, … Read more

पुण्यात तिघांनी केला गोळीबार ;डीपी रोडवरील घटना…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. तिघांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती येत आहे.शहरातील डीपी रोडवर गोळीबार झाल्याची माहिती आहे. ‘साम टीव्ही’ने हे वृत्त दिले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. ऐन दिवाळीमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना अलंकार पोलिस स्टेशनच्या हद्दीत … Read more

महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी; उपसभापती डॉ. गोऱ्हे…

निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालते वेळी सायरनचा वापर करावा असे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे पोलिसांना निर्देश पुणे दि. ५ : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश दिल्याचे विधानपरिषद … Read more

आयटी अभियंता महिलेची साडे तीन कोटींची फसवणूक; हडपसर येथील घटना…

( पुणे ) : हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटीत राहणाऱ्या ५४ वर्षीय आयटी अभियंता महिलेचे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमच्या नावाने मुंबई ते शांघाई पार्सल पाठविले जात असून त्यामध्ये एटीएम कार्ड, ड्रग्स सापडले आहेत. तुमचे पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यात पाठवून तपासायचे असल्याचे सांगून महिलेची तब्बल ३ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक … Read more

मेट्रोच्या बोगद्याला बेलबाग चौकातील खड्ड्याचा नाही धोका..

NEWS PRAHAR ( पुणे ) : बेलबाग चौकातील सीटी पोस्ट ऑफिस परिसरात तब्बल ४० फुट खोल खड्ड्यात ट्रक गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या खड्ड्याखाली शिवाजीनगर  न्यायालय -स्वारगेट महामेट्रोच्या मार्गाचा बोगदा आहे. त्यामुळे मेट्रोने प्रशासनाने या भागाची तपासणी केली. तसेच बोगद्याचीही पाहणी केली आहे. या पाहणीनंतर विहीरीमुळे मेट्रो मार्गाला कोणताही … Read more

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला करून केला खून;हल्ल्यात पत्नीही जखमी..

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपतीचा कारवार तालुक्यातील हाणकोण येथे रविवारी (ता. २२) पहाटे चार ते पाच मारेकऱ्यांनी खून केला. विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) असे त्यांचे नाव असून, ते मूळ हाणकोण येथील रहिवासी आहेत. या हल्ल्यात त्यांची पत्नी जखमी झाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, विनायक नाईक हे … Read more

न्यायालय परिसरात जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ; जुन्नर येथील घटना…

NEWS PRAHAR  ( जुन्नर ) : जुन्नर येथील न्यायालय परिसरात अचानक जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. चंद्रकांत किसन हांडे (वय ५४ रा.उंब्रज नंबर दोन ता. जुन्नर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयीन कामाकाजासाठी ते आपल्या बहिणींसोबत आलेले … Read more