Newsprahar

राजगड परिसरात गॅस रिफिलिंग, स्टील चोरी, पत्त्यांचे क्लब, मटक्याचे धंदे, या अवैध धंद्यांचा विस्फोट…!

NEWS PRAHAR ( PUNE ) दि : १७ ऑक्टोबर :  राजगड पोलीस स्टेशन परिसरात मटका ,जुगार, गांजा दारू विक्री, तसेच स्टील चोरी , गॅस चोरी ऑइल डिझेल चोरी‌ मागील काही दिवसांपासून स्थानिक पोलीस स्टेशनच्या कृपा आशीर्वादाने हा गोरख धंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलीस सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र यामुळे समोर आले आहे. टँकर मधून अवैधरीत्या गॅस काढून घेताना सिलेंडरचे स्फोट होतात, असे असताना देखील या परिसरात टँकर मधून गॅस काढून इतर छोट्या सिलेंडर मध्ये भरले जातात. 

तसेच या परिसरात स्टील चोरीचे देखील रॅकेट मोठे आहे. या अवैध्य धंद्यांमध्ये काही मोठे भांडवलदार उतरले आहेत. मोठ्या बांधकाम साइटवरून स्टील (लोखंडी सळई) घेऊन जाणाऱ्या वाहनांमधून काहीच टन स्टील उतरवले जाते. त्यानंतर वजन काटा मॅनेज करून वजनाची खोटी पावती घेतली जाते. बांधकाम साइटवर असलेल्या सुपरवायजरला पावती दाखवले जाते. सुपरवायजरने हरकत घेऊन पुन्हा वजन करण्याचा आग्रह केला, त्याला चिरीमिरी देऊन गप्प केले जाते. त्यानंतर चोरलेले स्टील अल्प दरात छोट्या व्यवसायिकांना विक्रीसाठी दिले जाते.

 या परिसरात फुगे नावाचा व्यक्ती रातोरात लाखो रुपयांचा स्टील चोरीचा प्रकार करत आहे. परंतु प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करण्याची तसदी देखील घेत नाही. उलट आमच्या परिसरात असा कोणताही प्रकार सुरू नाही असे बेधडकपणे सांगण्यात येते. याच सोबत महामार्गावरून गॅस सह पेट्रोल डिझेलची वाहतूक केली जाते त्यामुळे काहीजण स्थानिक पोलिसांना हाताशी धरून टँकर मधून पेट्रोल डिझेल काढून घेतात मोठ्या बांधकाम साइटवर असलेल्या जेसीपी आणि अवजड वाहन चालकांना या पेट्रोल डिझेलची कमी किमतीत विक्री केली जाते .दररोज रात्री हा गोरख धंदा सुरू असतो. 

या परिसरात हे एवढ्यावरच थांबत नसून जुगार ,मटका, गांजा विक्री अगदी रस्त्यालगत बाजार समितीच्या भिंतीला लागूनच मटक्या सारखा अवैध धंदे आहे ,या चालकांवर कारवाई होत नाही. उलट या पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम धंदे सुरू आहेत .पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.