निवडणूक आयोगाने केली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी…

NEWS PRAHAR  ( मुंबई ) : विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतं आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील तब्बल 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश काढले….

NEWS PRAHAR ( पुणे )  : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील 20 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर केल्या आहे. त्या बदल्या तात्पुरत्या असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. चतुर्शिंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळकोटगी त्यांचे नियुक्ती करण्यात आली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटकर कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

विधानसभेतून माघार घेईन अन् माझी जागा महायुतीला देईल ; बच्चू कडूंनी स्पष्ट सांगितलं..

NEWS PRAHAR ( छत्रपती संभाजीनगर ) : ‘‘सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार. आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर माझीही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी … Read more

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने कारने दोघांना उडवलं…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील बड्या बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांच्या जीव धोक्यात घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. पोर्शे अपघातानंतर … Read more

विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील…

NEWS PRAHAR ( पुणे ): आंबेगाव तालुक्यातील विद्युत वितरण विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विविध विभागांची विकासकामे गतीने पूर्ण करण्यासह कृषी विभागासह अन्य विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. घोडेगाव येथे पंचायत समितीच्या हुतात्मा बाबु गेनू सभागृहात आंबेगाव तालुक्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी … Read more

सौ. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा…

NEWS PRAHAR ( PUNE ) : सौ. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा देताना राष्ट्रवादी युवक पुणे शहर उपाध्यक्ष ॲड. सागर चंदनशिवे .सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात यावे, असा निर्णय पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करताच अशी संधी मिळाली व राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. वहिनी उत्तमरित्या काम करतील असा आमचा विश्वास … Read more

निवडणूकीनंतर सरकार आमचेच असेल…शरद पवारांचं वक्तव्य…

NEWS PRAHAR ( सुपे ) : या वेळी आम्ही ठरवलंय महाराष्ट्राचे सरकार काही झाले तरी हातात घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी, कांदा व दुधाच्या दराचा प्रश्न कसा सुटत नाही ते बघू. आता तुम्ही विधानसभेसाठी काम करा. बाकी कामाचे ओझे माझ्या खांद्यावर टाका, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे दिली. आगामी … Read more

मला राज्यातलं सरकार बदलायच आहे…असे शरद पवारांचे मोठे विधान…

NEWS PRAHAR ( पुणे ) : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणूक ठाकरे आणि पवारांसाठी अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी सर्व दावे आणि एक्झिट पोल खोटे ठरवत दमदार विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरेंच्या … Read more

आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला ऑफर दिल्याचा आयुक्तांनी केला खुलासा…

‘गुन्हा अंगावर घे, तुला वाट्टेल ते देतो’..! पुणे- अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांसदर्भात पत्रकार परिषद देऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोपीच्या आजोबांनी फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवलं होतं. ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला. … Read more