कोंढवा भागात जड वाहनांचा सुळसुळाट कायम ? कोंढवा बुद्रुक आंबेडकर नगर येथिल बिल्डरच्या खोदकामाचा राडारोडा दिवसा रहिवाशी भागातून.

पुणे प्रतिनिधी : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांना सकाळ-संध्याकाळ बंदी घाला, हा पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश अजून लाल फितीतच अडकल्याने पुणेकरांचे हाल अजूनही सुरूच आहेत. आता प्रशासनाला हलवण्याचे कामही अजित पवार यांनाच करावे लागेल का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमी पाहता या भागात अवजड वाहतूक … Read more

घारगाव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने अवैध्य धंद्यांना खत पाणी घालतय तरी कोण…?

संगमनेर : घारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बोटा घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोटा गाव अकलापूर रोड मुन्ना शेख यांच्या जागेत निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये राजू लाबखेडे यांचा पत्त्याचा क्लब आहे तसेच येथे अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच या अवैध धंदेचालकांची परिसरात दहशतदेखील आहे. गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी ग्रामस्थांनी आता थेट न्युज प्रहारच्या … Read more

एसीपीं साठी ५ लाखाची लाच घेणारा अँटी करप्शनच्या जाळ्यात…….

पुणे प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्यासाठी लाच मागणाऱ्या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस आयुक्त यांच्यासाठी जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पाच लाख रुपयांची लाच मागून १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना ओंकार भरत जाधव या … Read more

BIG BREAKING :अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामची मैत्री भोवली ; लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार….

पुणे प्रतिनिधी : कात्रज परिसरातील एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेली मैत्री चांगलीच भोवली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकावर पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफाक सय्यद (वय 19, रा मांगडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

येरवडा कारागृहात जेलरला बेदम मारहाण…

पुणे प्रतिनिधी : येरवडा कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येरवडा कारागृहामध्ये एका अधिकाऱ्याला आंदेकर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून कारागृहातील सुरक्षारक्षक आणि अधिकारी देखील सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी १० ते १२ जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू … Read more

स्थानिक गुन्हे शाखा, व नारायणगाव पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी ; वृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणारी पती- पत्नीची जोडी ४८ तासांचे आत जेरबंद…

पुणे प्रतिनिधी ; मौजे मांजरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे गावातील धनवटमळा येथील महिला नामे सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वय ७० वर्षे या एकटया घरी असताना त्यांचा त्यांचे राहते घरी कोणतरी अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला होता. त्यांचे घरातील कपाट उचकटलेले व कपडे अस्ताव्यस्त होते. सदर प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६५ … Read more

दुचाकीच्या डीकीमधुन तब्बल १९,५०,०००/- रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास खडक पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे प्रतिनिधी : फिर्यादी यांचेवर पाळत ठेवुन त्यांचे दुचाकीच्या डीकीमधुन रोख रक्कम रु ११,५०,०००/-रु सफाईदार पणे चोरी करुन नेल्याची घटना दिनांक ०२/०२/२०२४ रोजी खडक पोलीस स्टेशन हददीमधील टिंबर मार्केट परिसरात घडली होती.  सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महेश शिवाजी नाळे, वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं सी ९, फेज २, निर्मल … Read more

शिरूर शहरात पुन्हा एकदा पिस्टल बाळगणारी टोळी जेरबंद. तीन गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूस हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ची कारवाई…

शिरूर प्रतिनिधी : दि. १०/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे पथक शिरूर परीसरात शिरूर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत असताना, पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे गोलेगाव ता. शिरूर जि. पुणे या गावाकडे जाणारे रोडवर पुणे ते अहमदनगर हायवे ब्रीज जवळ काळया रंगाच्या काचा असलेली एक लाल … Read more

गॅरेजला उभ्या असलेल्या १४ टायर गाडीचेपाच टायर डिस्क सह चोरले : साडेअकरा लाखांच्या मुद्देमालासह आवळल्या आरोपींच्या मुसक्या सुपे पोलिसांची कामगिरी…..

  सुपे परगणा (प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील मोरगाव-सुपा रस्त्यावर टाकळवस्ती भोंडेवाडी गावच्याहद्दीत शिवशंभू बॉडी बिल्डर गॅरेज समोरील मोकळ्या जागेत उभा  केलेली टाटा कंपनीचा MH 12 FZ 6651 या गाडीचे पाच काळा रंगाचे डिस्क सोबत असलेले टायर व दोन लाल रंगाच्या एक्साइड कंपनीच्या इलेक्ट्रिकल बॅटरी चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या सुपे पोलिसांनी आवळल्या आहेत.    याबाबत आबा शंकर … Read more

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; रविंद्र राजपूत, केवलसिंग कच्छवासह महिलेस अटक…

चाळीसगांव :- रेल्वे स्टेशन परिसरातील फुले नगर मधील अल्पवयीन मुलीस आपल्याला कामाला जायचे आहे असे सांगून रमाबाई अजय शिंदे (वय ५५) रा. राखुंडे चाळ, जुना मालेगांव रोड हिने मालेगांव बायपास रोड परिसरात असलेल्या हॉटेल निवांतमध्ये असलेल्या झोपडीत नेले.  या ठिकाणी रविंद्र ऊर्फ बापू अर्जुनसिंग राजपूत (वय ५४ रा. जुने मराठा मंगल कार्यालय, ईच्छादेवी रोड, चाळीसगांव) … Read more