महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना ? पुणे व पिंपरी चिंचवड शहराला गुटखा सप्लाय करणारे दिग्गज सप्लायर मोकाट….

पुण्यातील प्रसिद्ध गुटखा सप्लायर : कोथरूड परिसरात सुजित खिवंसरा, हडपसर मंदार ठोसर आणि मॉन्टी, कोंढवा येथे प्रकाश भाटी, आणि गुड्डू, गोकुळ नगर मयूर आगरवाल, हिंजवडी शाम जाट, महेंद्र राठोड, निगडी गजानन पवार, काळेवाडी दिनेश गांधी, चाकण ओमप्रकाश विष्णोई… न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे शहरात वेळोवेळी ड्रग्सवर मोठी कारवाई झाली परंतु गुटखा बंदी … Read more

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करणाऱ्या वसूली अधिकाऱ्याचा खुन.

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड- स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी. न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महराष्ट्र शाखेतील … Read more

विनापरवाना अफुची शेती करणारे दोघेजण मावडी क.प. गावातून घेतले ताब्यात ; ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल केला हस्तगत…पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई…

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक, श्री. पंकज देशमुख साहेब यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच कायद्याचा भंग करून शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड … Read more

बंदी असूनही नारायणगाव, आळेफाटा ,जुन्नर व वेल्हे येथे गुटखा विक्री सर्रास सुरूच…

जुन्नर येथील सलीम शेख नारायनगाव आळेफाटा येथील बाबाजी वाजे या गुटखा किंग विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही ? न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : ग्रामीण परिसरातील प्रत्येक गावात व खेड्यात किराणा दुकान, पानठेला इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी लटकवलेल्या आढळून येत आहेत. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटका विक्रेते हे … Read more

पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा कोडवर्ड झाला उघडकीस…

पुणे प्रतिनिधी : पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत २० फेब्रुवारीला पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११०० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील कारखान्यात तयार करण्यात आलेल्या ड्रग्जला एक कोडवर्ड देण्यात आला होता. “न्यू पुणे जॅाब” असा एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड होता. कुरकुंभ येथे अर्थकेम कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत … Read more

कोंढवा भागात जड वाहनांचा सुळसुळाट कायम ? कोंढवा बुद्रुक आंबेडकर नगर येथिल बिल्डरच्या खोदकामाचा राडारोडा दिवसा रहिवाशी भागातून.

पुणे प्रतिनिधी : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांना सकाळ-संध्याकाळ बंदी घाला, हा पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश अजून लाल फितीतच अडकल्याने पुणेकरांचे हाल अजूनही सुरूच आहेत. आता प्रशासनाला हलवण्याचे कामही अजित पवार यांनाच करावे लागेल का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमी पाहता या भागात अवजड वाहतूक … Read more

घारगाव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने अवैध्य धंद्यांना खत पाणी घालतय तरी कोण…?

संगमनेर : घारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बोटा घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोटा गाव अकलापूर रोड मुन्ना शेख यांच्या जागेत निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये राजू लाबखेडे यांचा पत्त्याचा क्लब आहे तसेच येथे अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच या अवैध धंदेचालकांची परिसरात दहशतदेखील आहे. गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी ग्रामस्थांनी आता थेट न्युज प्रहारच्या … Read more

एसीपीं साठी ५ लाखाची लाच घेणारा अँटी करप्शनच्या जाळ्यात…….

पुणे प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्यासाठी लाच मागणाऱ्या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस आयुक्त यांच्यासाठी जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पाच लाख रुपयांची लाच मागून १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना ओंकार भरत जाधव या … Read more

BIG BREAKING :अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामची मैत्री भोवली ; लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार….

पुणे प्रतिनिधी : कात्रज परिसरातील एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेली मैत्री चांगलीच भोवली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकावर पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफाक सय्यद (वय 19, रा मांगडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

येरवडा कारागृहात जेलरला बेदम मारहाण…

पुणे प्रतिनिधी : येरवडा कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येरवडा कारागृहामध्ये एका अधिकाऱ्याला आंदेकर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून कारागृहातील सुरक्षारक्षक आणि अधिकारी देखील सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी १० ते १२ जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू … Read more