नऱ्हे परिसरात एका गोडाऊनवर छापा टाकून गुन्हे शाखेने तब्बल एक कोटी ३९ लाखांचा गुटखा केला जप्त.

NEWS PRAHAR  ( पुणे ) : नऱ्हे परिसरात असलेल्या खाडेवाडीमधील एका गोडाऊनवर छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल एक कोटी ३९ लाखांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी चौघांना अटक केली असून एकाचा शोध घेण्यात येत आहे. पुष्पेंद्र अकबाल सिंग (वय २७), सुनील पथ्थन सिंग (वय ४५, दोघेही रा. नऱ्हे, मूळ. रा. उत्तरप्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत … Read more

संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सदर्न कमांडकडून आत्मनिर्भरतेवर एका चर्चासत्राचे आयोजन…

NEWS PRAHAR ( पुणे )  : पुण्यामध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाच्या (सदर्न कमांड) प्रादेशिक तंत्रज्ञान केंद्राने “ स्वावलंबन से शक्तीः भारत की नयी दिशा” या विषयावर राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिट्यूट(RSAMI) येथे एका महत्त्वाच्या चर्चासत्राचे आयोजन केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णतेला चालना देणे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांशी सुसंगत या … Read more

आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय ;गुन्हे शाखेकडून पर्दाफाश…

NEWS PRAHAR ( पुणे ) : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील परिसरात एका आयुर्वेदिक मसाज  उपचार केंद्रामध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर तीन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई माणिक बाग येथील जैन मंदिरा शेजारी … Read more

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची तब्बल 45 लाख 54 हजारांची फसवणूक…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात काम करत असल्याचे भासवून मंडळाच्या बँक खात्यातून तब्बल 45 लाख 54 हजार 917 रुपये ट्रान्स्फर करुन घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या सोमवार पेठेतील कार्यालयात 8 सप्टेंबर 2022 ते 25 एप्रिल 2024 या दरम्यान घडला आहे. … Read more

शासकीय कामात अडथळा; सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा…

NEWS PRAHAR  (लोणावळा)  : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लोणावळा नगरपरिषद कर्मचारी विजय साळवे (वय ५३, रा. डी-वॉर्ड गावठाण, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली. भुशी स.क्र.२४ सि.स.१ येथे इंद्रायणी नदीपात्रातील भराव काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. लोणावळा नगर परिषदेच्यावतीने हा भराव काढण्यात … Read more

अल्पवयीन आरोपीचा निरिक्षणगृहातला मुक्काम वाढणार…..

  NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात पोर्शे ही आलिशान कार भरधाव वेगात चालवून दोन तरुणांचा जीव घेतल्याच्या घटनेतील अल्पवयीन आरोपी बिल्डरपुत्राची बाल न्याय मंडळानं १३ दिवसांनी रिमांड वाढवली आहे. त्यानुसार, त्याला २५ जूनपर्यंत निरिक्षणगृहात ठेवण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी … Read more

पैशांसमोर झुकलेली सर्व सिस्टिम कामाला लावली ती आमदार रवींद्र धंगेकरांनी..

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात पोर्शे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आज ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक झाली.या दोन डॉक्टरांनी वेदांत अग्रवालचे रक्ताचे सँपल कचऱ्यात फेकून कुणा दुसऱ्याचेच सँपल टेस्ट करून लॅब रिपोर्ट बनवला.आता विचार करा हे डॉक्टर पोस्ट मार्टेम रिपोर्ट बनवत असतील तेव्हा कोट्यवधींचे व्यवहार करत आलेले असतील. राजकिय गुन्हे, बिल्डर लॉबीची प्रकरणे, खून प्रकरणे, … Read more

कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघातानंतर पुन्हा भीषण अपघात…

NEWS PRAHAR ( पुणे ) : भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री खराडी बायपास जकात नाक्याजवळ घडली. कल्याणीनगर भागात नुकत्याच झालेल्या पोर्श मोटार अपघातात दोन आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटले असतानाच पुन्हा अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा बळी गेला आहे. आदिल मजहर … Read more

कोंढवा खुर्द येथील अनाधिकृत बांधकामांचे डोंगर रचले गेले असुन पुणे महानगर पालिकेकडून कारवाई का नाही ?

पुणे  – कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असून प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. या बांधकामांना राजकीय नेत्यांचाही वरदहस्त असण्याची शक्यता आहे. अनाधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘न्युज प्रहार’ला माहिती सांगितली आहे. पुणे शहराच्या जवळ कोंढव्यात अनेक भागांत ही बांधकामे सुरू आहेत. मात्र, ही बांधकामे थांबविण्यासाठी … Read more