NEWS PRAHAR ( पुणे ): महाराष्ट्रातील पुण्यातील कुंडमाळा भागात इंद्रायणी नदीवर बांधलेला एक जीर्ण पूल कोसळला. पुल कोसळला तेव्हा त्यावर अनेक पर्यटक उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे नदीतील वाढलेला प्रवाह पाहण्यासाठी पर्यटक गेले होते. पूल कोसळल्याने सुमारे २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.