पोलीस आयुक्तांनी कलेक्टरांची शाळा भरवून देखील काही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे मसाज पार्लरच्या नावाखाली कोरेगाव पार्क येथे वेश्या व्यवसाय सुरूच….

कोरेगावपार्क , चंदननगर , विमानतळ , येरवडा , वानवडी , हडपसर , सिंहगड रोड ,कोंढवा , भारती विद्यापीठ  व इतर  पोलीस स्टेशन च्या हद्दीतील मसाज पार्लर च्या नावाखाली चाललेला वेश्या व्यवसायावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर कोणती कारवाई करतील याकडे पुण्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे… पुण्यातील मसाज पार्लर च्या प्रत्येक लेआउट मागे स्थानिक पोलीस स्टेशनची … Read more

आंबिल ओढा परिसरात मासे पकडताना वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह डेंगळे पुलाजवळ आढळला….

NEWS PRAHAR ( पुणे ) : कात्रज भागातील आंबिल ओढा परिसरात मासे पकडताना वाहून गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी मुठा नदीपात्रात डेंगळे पुलाजवळ आढळून आला आहे. या युवकाचा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. अक्षय संदेश साळुंखे (वय २६, रा. शिवमुद्रा चाळ, अप्पर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा बुधवारी संध्याकाळी … Read more

खडकवासला पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आव्हान….

NEWS PRAHAR ( पुणे ) : खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क आहेत. खडकवासला पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, … Read more

एकविरा देवी पायथा मंदिर ते कार्ला मळवली रस्ता २८ ऑगस्ट पर्यत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

NEWS PRAHAR ( पुणे ) : मावळ तालुक्यातील एकविरा देवी पायथा ते कार्ला मंदिर ते कार्ला मळवली दरम्यान मौजे कार्ला येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा रस्ता ३० जुलै ते २८ ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. मौजे कार्ला गावातून मळवली-भाजे गावाकडे … Read more

पुरस्थितीच्या दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासन लागले कामाला…!

NEWS PRAHAR  ( पुणे )- पुरस्थितीच्या दुसऱ्या दिवशी पाणी ओसरलेल्या ठिकाणी महापालिका प्रशासन पोचले. पुरबाधित नागरिकांना नाश्‍ता, जेवण देणे, रस्ते स्वच्छता, चिखल, गाळ काढणे, औषध फवारणी करण्यापासून ते नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करण्यापर्यंतची विविध कामे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत होती. महापालिकेला अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळांनी सहकार्याचा हात … Read more

कोंढवा कडनगर येथील मटका अड्डयावर व. पो. निरीक्षक संतोष सोनवणे यांची धडक कारवाई; नागरिकांनी केले अभिनंदन…

NEWS PRAHAR ( प्रतिनिधी- राहूल हरपळे )  : एन. आय. बी. एम रोडवर कडनगर येथे पेट्रोल पंपासमोर फिश मार्केटच्या मागे मागील अनेक दिवसांपासून मटका जुगार अड्डा जोरात सुरु होता, या अड्डयावर स्थानिक नागरिक,मजूर यांची वर्दळ होती.गोरगरीब नागरिकांना मटका- जुगाराचा नाद लावून नाद लावून मटका व्यावसायिक चांगलीच कमाई करत होता तेव्हा त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी याबाबत आवाज उठवल्यावर कोंढवा … Read more

उपनिरीक्षकपदी उदय काळभोर यांची पदोन्नती….

NEWS PRAHAR ( प्रतिनिधी- राहूल हरपळे ) :  मागील 33 वर्षांपासून पुणे शहर पोलीस दलात नोकरी करून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे लोणी काळभोरचे (ता. हवेली) सुपुत्र उदय सुदाम काळभोर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. उदय काळभोर यांच्या वडीलांनी देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. वडिलांनंतर मुलगाही पोलीस उपनिरीक्षक झाल्याने हे पद भूषविणारी बापलेकाची … Read more

पुण्यात चाललंय तरी काय?ससून रूग्णालयातील बेवारस रूग्णांना ससून हॅास्पिटलचेच डॅाक्टर निर्जन स्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार…

NEWS PRAHAR ( पुणे प्रतिनिधी- राहूल हरपळे ) : ससून हॉस्पिटलेच डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडून देतात अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दखल घेतली आहे. या घटनांवरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू आहे अशी माहिती गायकवाड यांना मिळाली. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश … Read more

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा बोलबाला कायम…

लोणी काळभोर : मागील काही महीन्यान पासुन उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. त्याच कारण म्हणजे उरुळी कांचन पोलिसांचा अद्यापपर्यंत चोरीचा कोणताही तपास न लागल्याने पोलिसांचा दम कमी होताना दिसत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत चाललेल्या चोरीच्या सत्रांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून … Read more

उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात, दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले, २ प्रवाशांचा मृत्यू…

UP Railway Accident : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे गुरवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे गुरवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे चंडीगड … Read more