Newsprahar

दलित युथ मुव्हमेंट सामाजिक संघटनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन….

NEWS PRAHAR ( पुणे )  दि : १३ फेब्रुवारी  ​: दलित युथ मुव्हमेंट सामाजिक संघटनेचे पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास दि, 25/2/26 पासुन पुणे पोलिस आयुक्त कार्यालय च्या मुख्य गेटवर बेमुदत धरणे आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. 


पुणे मार्केट यार्ड पोलिस स्टेशन हद्दीत चालु असणाऱ्या आंबेडकरनगर झोपडपट्टीतील प्रत्येक गल्लीबोळात व इतर ठिकाणी बेकायदेशिर अवैध धंदे चालु असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार सर यांना देवुन देखिल मार्केट यार्ड पोलिस स्टेशन हद्दीत आज रोजी देखिल अवैध धंदे चालु असुन त्या बाबत पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाला दलित युथ मुव्हमेंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश शेलार यांनी निवेदन दिलेले आहे व हे अवैध धंदे कायम स्वरुपात बंद करुन मार्केट यार्ड पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी किरण जाधव यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे दिलेली आहे.

जर वरील सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेवून त्यावर कारवाई न झाल्यास दि 25/2/26 पासुन पुणे पोलिस आयुक्त कार्यालय च्या मुख्य गेटवर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.