NEWS PRAHAR सुचिता भोसले ( पुणे ) : लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांना प्रशासकीय API लाड साहेबांच्या वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मात्र, या अवैध व्यावसायांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.लोणावळा परिसरात अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. पत्त्यांच्या जुगाराने सध्या जोर धरलेला दिसून येत आहे हा पत्त्यांचा जुगार थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सुरू असून लोणावळा परिसरातील व पुणे जिल्ह्यातील गुंठा मंत्री या ठिकाणी पत्त्याचा जुगार खेळताना दिसून येत आहेत.आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पैसा हातात खेळू लागल्याने गुंठामंत्र्यांच्या हौसेसाठी आणि उधळपट्टीसाठी क्लब हाऊस सुरू झाले. परंतु या क्लब हाऊस मध्ये अवैध पद्धतीने पत्त्याचा जुगार खेळला जात आहे. आता गुन्हेगारांसाठी जुगाराची ठिकाणे आश्रयस्थाने बनू लागली आहेत.
लोणावळा शहर पोलिस API लाड साहेबांच्या आशीर्वादाने पत्त्यांचा जुगार सावंत व मंगेश नावाचे व्यक्ती चालवत असल्याची माहिती न्यूज प्रहार च्या हाती लागली असून या पत्त्यांच्या जुगारांमध्ये १००/२०० चे २ टेबल व २००/४०० चा १ टेबल चालू असल्याची माहिती मिळाली आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक गेल्यापासून या परिसरात अवैध धंदे जोरदारपणे सुरू झाले असल्याचे समोर येत आहे. हा अवैध धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने दिवसा बंद व रात्री सुरु असा रात्रीस खेळ चाले असे सध्या चे चित्र आहे. कडक शिस्तीचे सक्षम अधिकारी गेल्यानंतर या परिसरातील अवैध धंदे वाढलेले दिसून येत आहेत.
लोणावळा परिसरात दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे तरुणाईचा पत्त्यांच्या जुगाराकडे कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत पत्त्यांच्या जुगारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
पोलिस विभागाच्या दुर्लक्षामुळे या अवैध धंद्यांना मोकळे रानच मिळाले आहे. या धंद्यांना पोलिसांनी ’एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी कडक कारवाई करावी.
अशा अवैध धंद्यांवर कारवाई होते. परंतु, नंतर हे व्यवसाय बंद होणे अपेक्षित असताना ते नव्या जोमाने सुरू होतात. पोलिसांचे नेमके कोणत्या कारणाने अशा व्यावसायांकडे दुर्लक्ष होत आहे हे न समजण्याइतपत परिसरातील लोक अज्ञानी नाहीत, अशी भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.