Newsprahar

हडपसर येथील कालीका डेअरी मध्ये धक्कादायक प्रकार….

NEWS PRAHAR ( पुणे ) :  हॉटेलच्या शौचालयात कामगाराने महिलेचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात हा प्रकार घडला.  याप्रकरणी, हडपसर पोलिसांनी भिमाशंकर तिपन्ना चरवादी (वय.32, रा. कर्नाटक) याला अटक केली आहे. याबाबत संबंधीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.22) दुपारी पावने तीन वाजताच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हडपसर येथील कालीका हॉटेल (बेकरी) येथील शौचालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना पत्र्यातून एक व्यक्ती मोबाईलद्वारे चित्रीकरण करत असल्याचे लक्षात त्यांच्या आले. त्यानंतर महिलेने आरडा-ओराड केला. त्यावेळी चरवादी हा चित्रीकरण करत असल्याचे निदर्शनास आले. महिला शौचालयाच्या शेजारीच पुरूषांचे शौचालय आहे. पुरूष शौचालयाच्या पत्र्याच्या फटीतून तो महिलांचे चित्रीकरण करत होता. 

महिलेने ही माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली . त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपी चरवादी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची पाहणी केली. त्यामध्ये त्याने फिर्यादी महिलेचे चित्रीकरण केल्याचे दिसून आले.  दरम्यान, आरोपीने आत्तापर्यंत अशा किती महिलांचे व्हिडीओ काढले आहे याचा देखील आता पोलीस शोध घेत असल्याचे मोगले यांनी सांगितले.