Newsprahar

खडकी पोलीस स्टेशन फक्त नावालाच का साहेब? अवैध व्यवसाय जोरात…

प्रतिनिधी – सुचिता भोसले (पुणे) : खडकी पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र  शुन्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळं खडकी,परिसरात मटक्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायिकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, मटका यांची दुकाने जोमात थाटली आहेत. कलेक्टर पवार या पोलिसांच्या मदतीने खडकी येथील गवळी वाड्यात मटका  व्यवसाय खुले आम चालू आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.

खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालू असल्याने; खडकी पोलीस कुठे  वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे का ? अशी चर्चा जोरदार चालू आहे. खडकी पोलिसांचे काम संशयास्पद असून, बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा. विशेष म्हणजे पोलीस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानतसुद्धा नसल्याचे बोलले जात आहे.

तर कोण पोलिस आमचे काही करू शकत नाही, आम्ही पोलीसांना महिन्याला लाखो रू हप्ते देतो; असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. ह्या लोकांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींना जवळ करून, पोलीसांच्या मदतीने व्यवसाय थाटला आहे की काय? असा सवाल येथील नागरिक करीत आहे.

सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा…

https://youtube.com/shorts/ZK1orCqOVHY?si=t8pbpTtGTKygXkBV

हे असे असेल तर पोलीस प्रशासनाने मात्र वेळीच यांना लगाम न घातल्यास, याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेला आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार हे मात्र निश्चित. पोलीसांकडून या धंदेवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी महिन्याला हप्ते वसुली केली जाते; अशी नागरीकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे. तर याविषयी पोलीस स्टेशनला तक्रार करणेस गेले की, धंदे बंद आहेत आसे सांगण्यात येते.

मग खडकी पोलीस काय हप्ते गोळा करण्यासाठी आहेत का? असा सवाल नागरिक करत आहेत. हे बेकायदा मटका, क्लब, गांजा अवैधधंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून, त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध धंदेवाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले असल्याचे बोलले जात आहे.

खडकी पोलीस चौकीपासुन थोड्याच अंतरावर आसलेल्या खडकी गाव अवैद्य धंदाच्या विळख्यात अडकले का?

 दारू जुगार असे एक ना अनेक धंदे खडकीत चालू आहेत. सरास हॅाटेलवरती विना परवाना दारू विकली जाते. खडकी चौकीचे पोलीस हे पाहुन सुद्धा न पाहिले सारखे करत असतात; कुठे रेड होनार आसेल तर ते कलेक्टर पवार साहेब हे आधीच कळवतात त्यामुळे अवैध धंदेवाले धंदे बंद करून बसतात.खडकी पोलीस स्टेशन ने आतापर्यंत कीती अवैद्य धंदे वाले यांचावर कारवाई केली PI साहेब तुम्हीच सांगा.! अवैद्य धंदे वाल्यांना तुम्ही तर पाटीशी घालत नाही ना ? किंवा नेते मंडळी यांच्यावर गुन्हे दाखल करू नका आसा दबाव आणत आहेत का ?  अशी नागरिकांमध्ये  जोरदार चर्चा चालू आहे.

चौकट…

अवैद्य धंदेवाल्याणीच पोलीस स्टेशन चालवायला घेतले का काय?

१)हेमंत गवळी मटका -२ लाख
२)सचिन पुराणीक मटका- ३ लाख
३)मनोज सुर्यवंशी मटका- २/३० लाख
४)पाटील इस्टेट ईराणी गल्ली गांजा -१ लाख
५)हात भट्टी ८ धंदे प्रत्येकी १०/२० हजार
६)बोपोडी गावठाण नाईक चाळ पत्ताचा क्लब-१लाख