फडणवीसांवर आरोप केल्यांनतर भाजप आमदाराचा जरांगेंना इशारा…

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : मराठा आरक्षणाच्या  मागणीवरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळत आहे. आज उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक होत मनोज रंगे पाटील … Read more

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी पुण्यामध्ये आयोजित महाराष्ट्र एमएसएमई संरक्षण प्रदर्शन 2024 ला दिली भेट.

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) :  राष्ट्र उभारणी मधील संरक्षण क्षेत्राच्या मोठ्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 24 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान आंतरराष्ट्रीय प्रदर्शन परिषद केंद्र, मोशी, पुणे येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग) संरक्षण प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी भारतीय हवाई दलाला आमंत्रित केले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एमएसएमई, … Read more

नवले पुलाजवळ भयंकर अपघात…

न्यूज प्रहार : ( पुणे प्रतिनिधी ): नवले पुलाजवळ विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.  कात्रजकडून नवले पूलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या … Read more

पुणे लोकसभेसाठी पुण्यातल्या बड्या उद्योगपतीनेही कसली कंबर…

पुणे : वाढता वाढता वाढे… हनुमानाची शेपटी अन पुणे लोकसभेसाठी इच्छुकांची यादी… असेच काहीसे चित्र पुण्यात पाहायला मिळतेय. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावायला अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन करत आहे. आता पुण्यातून लोकसभा लढवण्याची संधी द्यावी, अशी मागणी करत पुण्यातील एका बड्या उद्योगपतीने कंबर कसली … Read more

कलाकारांनी माणूस म्हणून भूमिका बजावली पाहिजे -अभिनेते सिध्देश्वर झाडबुके ;आंबेगाव येथे पुणे आंतरराष्ट्रीय युवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल संपन्न…

आंबेगाव : अभिनय क्षेत्रात काम करत असताना इतर चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट पाहणे गरजेचे आहे. शिवाय उत्तम कथा,पटकथा,संवाद असलेल्या कलाकृती कलाकार म्हणून पाहणे गरजेचे आहे.कलाकारांनी माणूस म्हणून कलाकृती आणि भूमिका बजावली पाहिजे. कलाकारांनी भूमिकेचा किंवा पात्राचा चष्मा लावताना स्पर्धा ही स्वतःशीच करायला हवी.असे प्रतिपादन अभिनेते सिध्देश्वर झाडबुके यांनी केले.युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने दुसऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय … Read more

महापालिकेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन…

पिंपरी, दि. २३ फेब्रुवारी २०२४ :- राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनता संपर्क अधिकारी … Read more

८ ते १० लाख लिटर पिण्याचे पाणी बाजार समितीच्या पाण्याच्या टाकीतून वाया…

मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व खराब झाल्याने सुमारे ८ ते १० लाख लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. टाकीत पाणी जास्त असल्याने पाण्याचा प्रेशर जास्त होता. तब्बल दोन ते अडीच तास पाणी वाहत होते. यामुळे मार्केट यार्ड येथील शिवनेरी रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. गुरुवारी १२ च्या सुमारास अचानक टाकीचा … Read more

पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा कोडवर्ड झाला उघडकीस…

पुणे प्रतिनिधी : पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत २० फेब्रुवारीला पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११०० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील कारखान्यात तयार करण्यात आलेल्या ड्रग्जला एक कोडवर्ड देण्यात आला होता. “न्यू पुणे जॅाब” असा एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड होता. कुरकुंभ येथे अर्थकेम कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत … Read more

कोंढवा भागात जड वाहनांचा सुळसुळाट कायम ? कोंढवा बुद्रुक आंबेडकर नगर येथिल बिल्डरच्या खोदकामाचा राडारोडा दिवसा रहिवाशी भागातून.

पुणे प्रतिनिधी : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांना सकाळ-संध्याकाळ बंदी घाला, हा पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश अजून लाल फितीतच अडकल्याने पुणेकरांचे हाल अजूनही सुरूच आहेत. आता प्रशासनाला हलवण्याचे कामही अजित पवार यांनाच करावे लागेल का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमी पाहता या भागात अवजड वाहतूक … Read more

घारगाव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने अवैध्य धंद्यांना खत पाणी घालतय तरी कोण…?

संगमनेर : घारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बोटा घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोटा गाव अकलापूर रोड मुन्ना शेख यांच्या जागेत निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये राजू लाबखेडे यांचा पत्त्याचा क्लब आहे तसेच येथे अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच या अवैध धंदेचालकांची परिसरात दहशतदेखील आहे. गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी ग्रामस्थांनी आता थेट न्युज प्रहारच्या … Read more