Newsprahar
BIG BREAKING : पुण्याच्या विभागीय आयुक्त सौरभ राव, अनिल कवडे यांच्यासह राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या…
पुणे प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकीआधीच प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ आय.पी.एस. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले होते. त्यानंतर आज (सोमवार, दि. ५ फेब्रुवारी) रोजी राज्य शासनाकडून राज्यातील ७ सनदी (IAS OFFICERS) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्याचे सध्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांची … Read more
परराज्यातुन पळुन आलेला १६ वर्षीय मुलगा सुखरुप कुटूंबियांचे ताब्यात ; मुंढवा पोलिसांची कामगिरी…
मुंढवा प्रतिनिधी : मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ताडीगुत्ता चौक येथे तृतीतपंती सोबत एक लहान मुलगा असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाल्याने, लहान मुलगा असल्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी तात्काळ ताडीगुत्ता चौक येथे सहा. पोलीस फौजदार उगले व स्टाफ पाठवून खातरजाम करण्यास सांगितले. सदर ठिकाणी तृतीयपंथी शिवाज्ञा रोहित रॉय रा. लक्ष्मीनगर, … Read more
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा जबाब ; गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यापासून जिवाला धोका…
पुणे प्रतिनिधी : कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे पुरवणी जबाबात सांगितले आहे. याबाबतची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यासंबंधीचा गोपनीय अहवाल देखील न्यायालयात सादर केला आहे. … Read more
पंकज देशमुख नविन पोलिस अधिक्षक ; पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांची बदली…
पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल आणि बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांची बदली झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक म्हणून आता पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांना बढती मिळाली असून त्यांना गडचिरोली … Read more
भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात…..
पुणे : भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे कामगार उड्डाणपूलावरील क्रॉस बॅरियरला रंग देण्याचे काम करीत होते. धडक बसल्यानंतर दोघांचा मृत्यू : चार जण गंभीर जखमी… पुणे प्रतिनिधी : भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे कामगार उड्डाणपूलावरील क्रॉस बॅरियरला रंग देण्याचे … Read more
पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
पुणे प्रतिनिधी : महापालिकाच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांना शिवीगाळ करणे कसब्याचे कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले असून यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी घडली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे. प्रजासत्ताक … Read more
हडपसर तपास पथकाकडून मौजमजेकरीता घरफोडी सह दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या तिघांना अटक…
पुणे प्रतिनिधी : हडपसर तपास पथकाकडून मौजमजेकरीता घरफोडी करणाऱ्यांना तिघा विधीसंघर्षीतांना ताब्यात घेऊन घरफोडीचे गुन्हे उघड केले आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत घडणाऱ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग … Read more
घरोघरी खाद्य पदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या झोमेंटो डिलिव्हरी बॉयला कोयत्याचा धाक दाखवून लुटले…
पुणे : घरोघरी खाद्य पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी कोणत्याही वेळी, कधीही आणि कोठेही जावे लागते. या डिलिव्हरी बॉयना आता गुंडांची भिती निर्माण झाली असून डिलिव्हरी बॉयला लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. रामटेकडी येथील उर्दु शाळेमागे एका डिलिव्हरी बॉयला याचा अनुभव आला. याबाबत निलेश पंडित गायकवाड (वय ३१, रा. मांजरी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. … Read more
आयटी इंजिनिअर महिलेच्या प्रियकरानेच गोळ्या झाडून केली हत्या…
पिंपरी-चिंचवड : हिंजवडीतील आयटी हब मधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका आयटी इंजिनिअर महिलेची तिच्याच प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली आहे. एका लॉजमध्ये या महिलेचा मृतदेह मिळाला आहे. प्रेम संबंधातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. ऋषभ निगम आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी व महिला हे दोघेही लखनऊचे असून आयटी कंपनीत काम … Read more