Newsprahar

हिंजवडीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट: PI बालाजी पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यूज प्रहार’च्या संपादिकांकडून शुभेच्छा…

हिंजवडीतील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’; लेट नाईट क्लब व देहव्यापाराविरोधात कारवाईचे संकेत…

हिंजवडी । प्रतिनिधी : दिनेश परमार

हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) बालाजी पांढरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यूज प्रहार’च्या संपादिका सुचिता हरपळे ( भोसले ) यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी झोन-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव साहेब यांचीही भेट झाली.

या भेटीदरम्यान हिंजवडी परिसरातील वाढती गुन्हेगारी, नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप असलेले लेट नाईट क्लब तसेच देहव्यापाराच्या कथित प्रकारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे यावेळी मांडण्यात आले.

हिंजवडी परिसरात काही आस्थापनांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारीही चर्चेत आल्या. विशेषतः तरुणाईची मोठी वर्दळ असलेल्या भागात पोलिसांनी नियमित तपासणी व आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी PI बालाजी पांढरे साहेब आणि DCP झोन-२ प्रदीप जाधव साहेब यांनी संबंधित तक्रारी व माहिती गांभीर्याने घेत, नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिल्याचे सांगण्यात आले. तसेच परिसरातील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हिंजवडी हा झपाट्याने विकसित होणारा परिसर असून आयटी कंपन्या, मोठ्या प्रमाणातील तरुण वर्ग आणि रात्रीची वाढती वर्दळ यामुळे येथील कायदा-सुव्यवस्था अधिक महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे पोलिसांकडून होणाऱ्या आगामी कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

न्यूज प्रहारच्या संपादिकेच्या या भेटीत वाढत्या गुन्हेगारीसह लेट नाईट क्लब आणि देहव्यापाराच्या कथित प्रकारांवर झालेली चर्चा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.