NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १७ जुन : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे भारतीय पत्रकार संघ लीगल विंग महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुण्यात अभिनंदन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
या निवडणुकीत संपूर्ण राज्यभरातून अंदाजे 2 लाखांहून अधिक ॲडव्होकेट मतदारांनी सहभाग घेतला होता. तब्बल 155 ते 160 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असताना पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील वकिलांनी एकजूट दाखवत पुणे जिल्ह्यातील 8 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून इतिहास घडवला.
विजयी उमेदवारांमध्ये ॲड. गणेश बाप्पासाहेब शिरसाट, ॲड. राजेंद्र बाबुराव उमाप, ॲड. विठ्ठल भाऊराव कोंडे-देशमुख, ॲड. डॉ. राजेंद्र दत्तात्रय अनभुले, ॲड. विकास विठ्ठलराव ढगे-पाटील, ॲड. अहमदखान उस्मान खान पठाण, ॲड. रंजना भोसले आणि ॲड. माधवी पोतदार यांचा समावेश आहे.
या सत्कार समारंभाला भारतीय पत्रकार संघ लीगल विंग महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. कैलास पठारे-पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग ढोरे-पाटील, महासचिव ॲड. योगेश तुपे-पाटील, संघटक ॲड. हेमंत भांड-पाटील, सरकारी वकील संघटना कार्याध्यक्ष ॲड. संतोषकुमार पताले, पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर बेलदरे-पाटील, नगर जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. प्रवीण गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी विजयी उमेदवारांनी पुढील पाच वर्षांत वकिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच पुण्यात हायकोर्ट बेंच स्थापन करण्यासाठी पाठपुरावा आणि वकील संरक्षण कायदा लवकर मंजूर व्हावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
उपस्थित मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भारतीय पत्रकार संघ लीगल विंग ही महाराष्ट्रासह देशातील 23 राज्यांत कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक, विधी, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
