NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १० डिसेंबर : कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
तरीही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार परिसरातील Sufi’s हॅाटेलमध्ये हुक्का पार्लर बेकायदेशीर चालु आहे. त्या ठिकाणी हुक्काच्या नावाखाली दारू , गांजा तसेच अमली पदार्थ मुलांना मिळत असलेल्या मुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. वानवडी परिसरात हा प्रकार रात्रीच्या वेळी सुरू असून, अशा हुक्का पार्लरला वानवडी पोलिस स्टेशन परिसरात परवानगी कोणाच्या आशिर्वादाने दिली आहे? राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लर व्यवसायावर २०१८ मध्ये कायद्याने बंदी आहे.
हर्बल हुक्का पार्लर नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अवैधरित्या हुक्का पार्लरवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करून कायदा अधिक कडक करण्यात येईल. अवैध हुक्का पार्लर चालविण्याचा तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास अजामीनपात्र गुन्हा समजण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
ई सिगारेटचे व्यसन तरुणाईला आपल्या विळख्यात ओढत आहे परंतु असे असूनही वानवडी पोलीस स्टेशन भागातील Sufi’s हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर पहाटे पर्यंत सुरू असल्याचे वास्तव पाहिला मिळत आहे.
अशा ठिकाणी काही महा भागांनी मिळून हुक्का पार्लर सुरू केले आहे. हे अवैध हुक्का पार्लर कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे पाहणे गरजेचे आहे. पुणे परिसरामध्ये अशा प्रकारचे हुक्का पार्लर झाल्याने येथील नागरिकांमध्ये आमची मुलं बिघडतील , अशा प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हे हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेलच्या मॅनेजर व वेटर यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल का ? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हुक्का पार्लरचे प्रस्थ रोखण्यासाठी २०१८ मध्ये कायदा करण्यात आला.
आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल का? पहिल्यांदा कारवाईत हुक्का सापडल्यास ३ वर्षे शिक्षा आहे. मात्र, आता कायद्यात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांदा हुक्का सापडल्यास ६ महिने हॉटेल अथवा रेस्टॉरंट परवाना रद्द करणे आणि तिसऱ्यांदा हुक्का सापडल्यास कायमचा परवाना रद्द करणे आणि संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. पोलीस कमिशनर काय कारवाई करणार? असा देखील खोचक प्रश्न या भागातील नागरिक विचारत आहे.
~ संपादिका सुचिता भोसले.