NEWS PRAHAR : गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान काल अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेला काही तास उलटले तोच, एअर इंडियाच्या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं. हे विमान फुकेतवरून नवी दिल्लीला येत होतं. विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती आहे. या विमानातील सर्व १५६ प्रवासी सुरक्षित आहेत.
नक्की घडलं काय…?
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या एआय ३९७ या विमानाने सकाळी ९.३० मिनिटांनी फुकेतवरून उड्डाण घेतलं होतं. पण उड्डाण घेतल्याच्या काही मिनिटांनंतर विमानात बॉम्ब असल्याची अफवा परसली. त्यामुळे पायलटने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय़ घेतला. इमर्जन्सी लॅंडींगनंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आलं सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.