बारामती ( प्रतिनिधी – संदिप आढाव ) : शालेय विद्यार्थ्यीला त्रास देणाऱ्या युवकावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य साळुंखे ( रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून २० वर्षांच्या विद्यार्थी हिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडिता ही सायन्स कॉलेज सोमेश्वर नगर वाघळवाडी ता.बारामती येथे शिक्षण घेत असुन ती एकटीच अभ्यास करताना आरोपी तिथे येऊन तु मला आवडतेस, तुझ्यावर प्रेम आहे तु होकार दे असे म्हणत त्रास दिला.
यावेळी तु माझ्या पेक्षा वयाने लहान आहे.तुझ्या विषयी माझ्या मनात काही नाही.तु त्रास दिला तर माझ्या घरच्यांना सांगते असे म्हटले यावेळी तु घरच्यांना सांगितले तर मी फाशी घेऊन अशी धमकी दिली.
अखेर कुटुंबातील व्यक्तींना सोबत घेऊन पिडीताने आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.तपास हवालदार अमोल भोसले करीत आहेत.