NEWS PRAHAR ( पुणे ) : तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत काही गावांमध्ये दिवसेंदिवस पीआय श्री.भदाणे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढत चालली आहे, तर दुसरीकडे खुले आम अवैध धंदे देखील सुरू आहेत. अनेक ढाब्यांवर दारू विक्री होत असून दिवसाढवळ्या बोटा परिसरात मटका तसेच अकलापूर रोडला मुन्ना शेख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पत्त्यांचा क्लब खुलेआम चालवला आहे मात्र असे असताना घारगाव पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने वातावरण बिघडत चालले आहे त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत चालला आहे कारण पोलिसांचा वचक राहिला नसल्याने सातत्याने विविध घटना घडत असतात. हद्दीतील अनेक गावांमध्ये किंवा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या ढाब्यांवर खुलेआम दारू विक्री होत आहे पण याकडे पोलीस लक्ष देत नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून बोटा येथे मटका व पत्त्यांचा क्लब सुरू आहे याबाबत घारगाव पोलिसांना माहिती असतानाही कारवाई केली जात नाही जेव्हा कंट्रोलला कॉल दिले जातात तेव्हा मार्शल वाले येतात आणि पैसे घेऊन जातात.
अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे . कारवाईसाठी गेलेले पोलीस कर्मचारी वरिष्ठांना कळवितात कि या परिसरात कोणतेही अवैद्य धंदे नाही सदर गोष्टीचा पंचनामा देखील केला जातो परंतु पंचनामांमध्ये येथे काही आढळून आले नाही असे दाखवले जाते याचा अर्थ असा आहे की, PI भदाणे साहेब व अवैध धंदेवाले यांचे नक्कीच काही ना काही साठे लोटे असल्याचे दिसून येत आहे याकडे खऱ्या अर्थाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे तेव्हाच अवैध धंदे बंद होतील.