Newsprahar

मृत्यूनंतर बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे वडिलांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या मुलाला अटक….

NEWS PRAHAR ( पुणे ) डिलांच्या मृत्यूनंतर बनावट स्वाक्षऱ्याच्या आधारे त्यांच्या विविध बँक खात्यातून दहा लाख रुपये काढणाऱ्या मुलाला न्यायालयाने दहा महिने साधा कारावास आणि २९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा निकाल दिला.

किसन नागू ओरसे (वय ४६, रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ अनिल नागू ओरसे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज केला होता. अनिल ओरसे यांनी वडिलांच्या विविध बँकांकडून माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागविल्यानंतर भावाने रक्कम हडप केल्याचे दिसले.

त्यांनतर या प्रकरणाबाबत भावाने आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत अर्ज केला होता. मात्र पोलिसांनी त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने किसन विरोधात गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश चतुःश्रृंगी पोलिसांना दिले होते.

त्यानंतर पोलिसांनी किसन विरोधात मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा अपहार, फसवणूक, दस्तावेजांचे बनावटीकरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करत आरोपपत्र दाखल केले होते. आरोपीने वडिलांची मुदत ठेव त्यांची बनावट स्वाक्षरी करून एक ऑगस्ट २००५ ला मोडली. मात्र आरोपीच्या वडिलांचा १७ जुलै २००५ ला मृत्यू झाला होता.

सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी या खटल्यात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सात साक्षीदार तपासले. हवालदार रमेश विधाते यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली केले.

असा प्रकार करणाऱ्यांवर प्रतिबंध बसायला हवा –

आरोपीचा भाऊ आणि वहिनी, बँक ऑफ बडोदाच्या शिवाजीनगर शाखेचे व्यवस्थापक आणि बँक अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या डेक्कन जिमखाना शाखेचे व्यवस्थापक यांची साक्ष, पोलिसांनी केलेला पंचनामा, हस्तलेखन तज्ज्ञांचा अहवाल, तसेच वडिलांचे दाखल केलेले मृत्यू प्रमाणपत्र आणि माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहिती महत्त्वाची ठरली. केवळ आरोपीच नव्हे तर असे कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर देखील प्रतिबंध बसायला हवा असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.