महाळुंगे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादाने अवैध्य व्यवसायाला मिळतंय पाठबळ…
NEWS PRAHAR ( पिंपरी -चिंचवड ) : पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुणे जिल्ह्यामध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण, महाळुंगे पोलीस ठाण्याला विशेष महत्त्व आहे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील गुन्हेगारीचा आलेख मोठा आहे. घातक शस्त्र, पिस्तूल,गावठी कट्टे,तलवारी, गांजा बाळगणाऱ्या पासून खून, दरोडे, लूटमारीचे तसेच खंडणी, हप्ते मागणी व इतर प्रकार सातत्याने घडत असतात.महिलांच्या छेडाछेडीचे प्रकार सातत्याने घडत असतात.
~ सचिन पवार व शिवदास पवार यांचा तीन पत्ती नावाचा जुगार चालू 👇🏻
महाळुंगे पोलीस स्टेशन च्या हद्दी मधील अवैद्य मटका व जुगार धंदे कधी बंद होणार? या धंद्यांमुळे गोर गरीब झोपडपट्टी मधील नागरीकांचे संसार पार उद्ववस्त झाले आहे. या अवैध मटक्या च्या धंद्यामुळे तेथील तरूण मुले गुन्हेगारी कडे वळत आहेत. या हद्दीतील अवैध मटक्या चा धंदा हा गेली कित्येक वर्ष राजरोसपणे चालु आहे. वारंवार तक्रारी व आंदोलने करून सुद्धा हा अवैध मटका ,क्लब ,सोरट धंदे हे कायम चालुच असतात.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील चाकण व महाळुंगे परिसरात अवैध धंदे,मटका, जुगार यांना ऊत आला आहे.अवैध धंद्यावर नियंत्रण येण्यासाठी पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे अशी नागरिक, कामगारांकडून मागणी होत आहे. अगदी राजरोस पणे चाकण बस स्थानक आवारात तसेच चाकण, महाळुंगे परिसरात मटक्याला उत आला आहे .
अवैद्य धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष देऊन संबंधित मटका चालकांवर धाक राहील या स्वरुपात यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे