नविन कलेक्टर काळे यांच्या आशिर्वादाने अवैध्य धंद्ये जोमात…
NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे :- उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी, दारू, जुगार ,गांजा ,वेश्या व्यवसाय अशा एक ना अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू झाला आहे. यासंदर्भात पोलिस स्टेशन मध्ये वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे.
उरुळी कांचन हे हवेली तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावाची राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतशील तसेच झपाट्याने विकास होणारे गाव म्हाणून ओळख निर्माण झाली आहे. पुणे शहरात ये-जा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे सेवाही उपलब्ध असल्याने या गावाचे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे.
विक्रांत उर्फ (विकी) कांचन यांचा उरूळी कांचन बाजार मैदान येथील मटका व्यवसाय :
गावाच्या हद्दीतील विविध भागात व वाड्यावर मोठ्या प्रमाणात अवैध धंदेही बोकाळले आहेत. या अवैध धंद्यामुळे किरकोळ भांडणांसह मारहाण व गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. याशिवाय हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांच्या घरामध्येही दारू पिणे आणि जुगारा खेळण्या मुळे वाद होतात. या अवैध धंद्यासंदर्भात अनेक महिलांनी अवैध धंदे चालविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडेही तक्रारी केल्या आहेत.
मात्र त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. तक्रार करणाऱ्यांना अवैध धंदे चालकांकडून धमकावले जात आहे,तर पोलिस या सर्व घटनांकडे व अवैध धंद्यांकडे डोळेझाक करत असल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी ‘न्युज प्रहार’च्या प्रतिनिधीकडे केल्या आहेत. अनेक महिलांनी पोलिसांत तक्रारी देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस तक्रार नोंदवून घेतच नाहीत, असे आरोप काही महिलांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केले आहेत.
या परिसरात चालतात अवैध धंदे :
इंदिरानगर, बायफ रस्ता, गोळे वस्ती, बडेकरनगर, तुपे वस्ती ,महादेवनगर, जय मल्हार रस्ता, गारूड वस्ती, बाजार मैदान, लोखंडेनगर तसेच पुणे सोलापूर महामार्गावर विविध ठिकाणी दारू, मटक्याचे धंदे राजरोसपणे सुरू आहेत.
अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळून देखील अवैध धंदे सुरू दिसल्यास कारवाई करतो असे नागरीकांना सांगितले जाते परंतु तक्रार आल्यानंतर ही जानीवपुर्वक दुर्लक्ष व टाळाटाळ केली जात आहे. पुणे पोलीस अधिक्षक या उरुळी कांचन पोलीस स्टेशन मधील अधिकारी म्हणजेच पोलीस निरीक्षक व त्यांचे लागे बांधे असणाऱ्या व नव्यानेच कलेक्टर झालेल्या काळेंनवर कोणती कार्यवाही करतील का? असा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र सध्या उरूळी कांचन परीसरातील नागरीकांना भेडसावत आहे.
~ पुढील बातमीत अवैद्य धंद्यांची लिस्ट प्रसिद्ध करत आहोत….