Newsprahar

पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खुले आम चालतोय गांजा विक्री चा व्यवसाय, सहकारनगर येथील प्रकार…!

सहकारनगर परिसरातील गांजा किंग सौरभ कट्टीमणी (पाटील ) पुणे सातारा रोड यावर कारवाई होणार का..?

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे : वैध मटका,गांजा व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिस प्रशासनाला सहकारनगर परिसरात गांजा बंद करण्यात अपयश येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं आहे.

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदा गांजा व्यावसायिकांचे प्रमाण फोफावत असल्याने अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः गांजा माफिया एक नसून गल्ली बोळात स्वतंत्रपणे गांजा विकत असल्याचे लोकचर्चेतून समजत आहे.

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

त्याच बरोबर सहकारनगर पोलीस स्टेशनवर थेटच पोलीस आयुक्तांचे लक्ष कमी झाल्याने सहकारनगर पोलिसांनी मोकळा श्वास घेतला आहे त्याचा परिणाम वाढती गुन्हेगारी, नाईट गांजा विक्री याला परत ऊत आला आहे की काय? सहकारनगर सर्वाधिक गांजा या अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे. त्याच बरोबर गुटख्याचे सर्वाधिक मोठे होलसेल बाजार याच भागात आहेत.

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

थोडक्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून थेट गांजा व गुटख्यासहित अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. गांजा च्या माध्यमातून दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याच भागात नाईटच्या धंद्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी देऊन देखील कारवाईचा दिखाऊपणा करत आहेत सहकारनगर परिसरात गुन्हेगारी टोळ्या देखील सर्वाधिक आहेत.

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

याच परिसरात पुणे सातारा रोड रांका ज्वेलर्स च्या बाजुला मोकळ्या जागेत व शारदा गोविंदराव पवार फिटनेस क्लब च्या बाजुला माशेवाल्याच्या मागील गल्लीमध्ये आत जाणे नवग्रह मंदिराच्या झाडाच्या मागील बाजूस या दोन्ही ठीकानी गांजा मोठ्या प्रमाणात विक्री केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे तसेच दिवस रात्र गांजा विक्रीला येथील रहीवाशी वैतागले आहेत अनेक तक्रारी करून देखील एकजण कारवाई करतो तर दुसरा गांजा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दादागिरी करतो असाच प्रकार सध्या सहकारनगर पोलिसांकडून केला जात आहे.

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

गांजा माफीयांकडे कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात लालची प्रवृत्तीचे लोक या गांजा व्यवसायाच्या मागे लागलेले असून आज पर्यंत हे गांजा किंग लाखो करोडो ने श्रीमंत होत आहेत मात्र १००,५००,१००० रू गांजाच्या पुड्या विकून लोकांना व्यसनाच्या दरीत ओढले जात आहेत.

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

सर्व गांजा माफियांचा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून स्थानिक यंत्रणेला “अर्थपूर्ण” पद्धतीने सोबत घेऊन चालत असल्यानेच सहकारनगर परीसरात हा गांजा व्यवसाय तेजीने व बेधडक सुरु असल्याचे लोकांमध्ये खुलेआम चर्चिले जात आहे.तर पोलीस प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यात येऊन मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना गांजा विक्री पासुन दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक अपेक्षा बाळगून आहेत

वसुली बहाद्दर करताहेत दरमहा लाखोंची वसुली…….

गांजा व्यावसायिकांना स्थानिक पोलिस, गुन्हे अन्वेषण विभाग किंवा इतर विशेष पथकाचा छापा पडणार नाही याची खात्री असल्याने या परिसरात संगनमताने अवैध गांजा व्यवसायांचा जम बसवण्यात आला आहे. दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायाने पोलिसांना हाताशी घेऊन व्यावसायिकांनी देवाण घेवाण वाढवून आपली छाप बनवली आहे या व्यावसायिकांना प्रशासनाची कोणतीच भीती राहिली नसून पोलिसांशी लांघेबाधे करून व्यवसाय जोरात सुरु आहे की काय अशी नागरीकांन मध्ये जोरात चर्चा सुरू आहे.हा गैरप्रकार दिसूनही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाहीत ना? अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻

गांजा विक्रीची दोन ठिकाणे :- १) पुणे सातारा रोड रांका ज्वेलर्स च्या बाजूला मोकळ्या मैदानात. २) माशे वालिच्या पाठी मागे पुणे महानगर पालिका शारदाबाई गोविंदराव पवार जिम बाजूला