NEWS PRAHAR ( प्रतिनिधी- राहूल हरपळे ) : मागील 33 वर्षांपासून पुणे शहर पोलीस दलात नोकरी करून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे लोणी काळभोरचे (ता. हवेली) सुपुत्र उदय सुदाम काळभोर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. उदय काळभोर यांच्या वडीलांनी देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. वडिलांनंतर मुलगाही पोलीस उपनिरीक्षक झाल्याने हे पद भूषविणारी बापलेकाची लोणी काळभोर मधील ही पहिली जोडी ठरली आहे.
उदय काळभोर यांचे प्राथमिक शिक्षण कदमवाकवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पदवीचे शिक्षण घेतले आहे.
सन १९९९ मध्ये ते पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले. काळभोर यांनी शहर पोलीस मुख्यालयात ९ वर्षे, फौजदारपदावर लोणी काळभोरमधील बापलेकाची पहिली जोडी पुणे शहर वाहतूक विभागात ३ वर्षे, विश्रामबाग पोलीस ठाण्यात १ वर्ष, वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात प्रत्येकी ६ वर्षे सेवा बजावली आहे. या कालावधीत त्यांना नाईक व पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाली. त्यानंतर उदय काळभोर यांनी खंडणी विरोधी पथकात ३ वर्ष, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकात ३ वर्ष सहायक फौजदार म्हणून कर्तव्य बजावले.