NEWS PRAHAR ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच राज्यात लोकसभेची निवडणूक झाली. यामध्ये निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. त्यावरच पवार गटाने लोकसभेची निवडणूक लढवली.
मात्र पवारांनी दिलेल्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे चिन्ह दिले होते. त्यामुळे याचा पवार गटाला मोठा फटका बसला. तब्बल ४ लाख १४ हजार मते तुतारी सदृश्य पिपाणी चिन्हाला मिळाली. यामध्ये बारामती मतदारसंघात सोयलशहा शेख १४ हजार ९१७ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.
शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर २८ हजार ३३० मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नगरमध्ये मोहन आळेकर ४४ हजार ५९७ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. रावेरमध्ये एकनाथ साळुंखे ४३ हजार ९८२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.
वर्ध्यात मोहन रायकवर २० हजार ७९५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर माढ्यात रामचंद्र घुटुकडे यांनी ५८ हजार ४२१ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तुतारी हे चिन्ह नवे होते. पहिल्यांदा मतदान झाले आहे. परंतु तुतारी आणि पिपाणी हे चिन्हामध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे ही मते मिळाली आहेत, असा अंदाज लावता येईल.