मास्क क्लब मध्ये लेडीज बाऊन्सर नाहीत.
लहान मुंलीना देखील प्रवेश दिला जात आहे.
न्यूज प्रहार ( पुणे ) – पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यात अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिक्षणासाठी येतात. विविध मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. शिक्षणासाठी हजारोंनी पैसे भरतात. पुण्यात अव्वल दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि शिवाय मोठमोठ्या शिक्षण संस्थादेखील आहेत. त्यामुळे पालकही मोठ्या उमेदीने आपल्या पाल्याला पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात मात्र याच पुण्यात या विद्यार्थ्यांचा पार्टी फिलर म्हणून वापर करण्यात येत आहे.
सध्या पुणे शहरात पब कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. शहरात मध्यरात्री दोन नंतरही मोठ्या आवाजात कल्याणीनगर येथील मास्क नावाचा पब मध्ये पार्टी सुरू असतानाचा व्हिडीओ “न्यूज प्रहारच्या” स्टिंग ऑपरेशनमुळे उघडकीस आला आहे. हॉटेलवर मास्क पब वर कारवाई करण्यात यावी नियमबाह्य पद्धतीने रात्री पबमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम रात्री २ नंतर ही सुरु ठेवल्याप्रकरणी कल्याणीनगर येथील नामांकित मास्क पब येथे कारवाई करण्यात यावी. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मास्क पब वर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करावी.
शहरातील हॉटेल, पब, बारमध्ये उशीरा दोन पर्यंत पार्टी सुरू असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे व उत्पादन शुल्क विभागाकडे येत आहेत यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी. या पार्श्वभूमीव रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करणे गरजेचे आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील नामांकित हॉटेलवर कारवाई करण्यात यावी असे नागरीकांचे म्हणणे आहे. अशा हॉटेल आणि पब वर दंडात्मक कारवाई करण्यात आवी.
मागील आठ दिवसात पुण्यातील बरेच हॉटेल्स आणि पबवर राज्य उत्पादन शुल्क विभाग लक्ष ठेवून आहे. तसेच पोलिसांनी शहरातील गस्त देखील वाढवली पाहीजे.
मास्क पब कल्याणीनगर…
पुण्यातील पब कल्चरमध्ये वाढ…
कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, बालेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. पबमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. कपल एन्ट्री, फ्रि ड्रिंक शिवाय गर्ल्स नाईट यांसारख्या सवलतींना व लहान वयाच्या तरुणाईला भुरळ पाडून सध्या पब संस्कृतीकडे वळवले जाऊ लागले आहे.
काही पब मध्ये लेडी बाउंसर यांची कमतरता :
कोरेगाव पार्क येथील बऱ्याच पब मध्ये लेडी बाउन्सर नाहीत. यामुळे जर एखाद्या महिलेवर किंवा मुलीवर काही अत्याचार झाले तर याला जबाबदार कोण त्यामुळे नियमांना जुगारून चालणाऱ्या या चालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
पार्ट्यांसाठी कमी वयातील विद्यार्थ्यांचा वापर…
पुण्यातील पब मध्ये दोन नंतरही धांगडधिंगा पब धारकांमुळे पुण्याची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे यावर पुणे पोलीस आयुक्तांनी पुन्हा नविन नियमावली करण्याची गरज आहे अशी चर्चा नागरीक करत आहेत.