Newsprahar

पुणे शहर वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार; सर्वच वाहतूक विभागातील कलेक्टर व झिरो पोलीस करत आहेत पठाणी वसुली…

पुण्यातील सर्वच वाहतूक विभागाच्या कलेक्टरांची नावा सहीत पोलखोल लवकर करणार…

न्यूज प्रहार ( पुणे ) – पुणे शहर वाहतूक शाखेचे काही कर्मचारी हे झिरो पोलिसांच्या सहाय्याने ‘वसुली’ करत असल्याचे पुणे शहरात सध्या चित्र दिसत आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे वाहनांची तपासणी करण्याचे आदेश व टोईंग वाल्यांना पावत्या करण्याची परवानगी वाहतूक निरीक्षकांनी दिली असल्याचे टोईंग व झीरो पोलिस प्रत्येकाला सांगत आहेत असे सध्या पुणे परीसरात सर्वत्र दिसत आहे.

शहरात वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक पोलिस अनेकदा वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीत दंग असतात, असा आरोप यापूर्वी अनेकवेळा झाला आहे.रस्त्याने येणारे-जाणारे वाहनचालक हेरण्याचे काम झिरो पोलीस व नो पार्किंग वाहन उचलण्याचे काम टोईंग कर्मचारी करत असतात. पुण्यात सर्वच ठिकाणी अचानक अडवून लायसन्सची मागणी केली जाते बरीच कागद पत्राची मागणी होत असते .

काबऱ्याचदा वाहनचालकांकडे कागद पत्रे नसल्याचे सांगताच त्याला दंड भरण्याच्या सूचना झिरो पोलिस करत असतात व टोईंग कर्मचारी दंड आकारत वाहनचालकांकडून दंड घेतले जात असल्याचे ही नागरिकांकडून सांगण्यात येते असा प्रकार सर्वच वाहतूक विभागात चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. ड्युटीवर हजर असलेला गणवेशाधारी वाहतूक पोलिस हा सर्व प्रकार पाहत होते.हे ‘न्यूज प्रहार’ प्रतिनिधीने मोबाइलमध्ये फोटो घेताच त्या वाहतूक पोलिसांची चांगलीच पळापळ झाली.

पोलिस दलात पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. काही ‘वजनीअधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरातील अवैध वाहतूक सुसाट सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पुण्यातील शहरात सर्वच विभागात असणाऱ्या पठाणी वसुलदार हे अवैध वाहतूक, वाळू (रेती)वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक,अवजड वाहतूक अशाच प्रकारच्या अनेक वाहतुकीस प्रोत्साहन देऊन स्वतःच्या खिसे गरम करत आहे.

बसस्थानकासमोर कहर..

बसस्थानका समोर मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यात हातगाड्यांचाही माेठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. त्यातच बसस्थानकातील प्रवाशांची सतत गर्दी राहते. त्यातच प्रवासी मिळवण्यासाठी येथे काळी-पिवळी, ऑटोचालकांची मनमानी असून, वाटेल तेथे वाहने उभी केली जातात, आणि या ऑटो मध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवलेले असतात. तसेच या ठिकाणी विविध ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस सुद्धा बेशिस्तपणे लावलेल्या असतात रात्री तर पूर्ण रोडवरती याच गाड्यांच्या रांगाच रांगा दिसून येतात यावर तक्रार केली असता कोणतेही ट्राफिक कर्मचारी कारवाई करण्यास येत नाही असा अनुभव अनेकदा नागरिकांना आलेला आहे.

पोलिसांचे होतेय दुर्लक्ष..

शहरातीलप्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिस उभे असताना त्यांच्या डोळ्यासमोर वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पोलिसांच्या डोळ्यादेखत कुठेही वाहने उभी केली जातात. अवैध वाहतूकदार वाहने प्रवाशांनी गच्च भरून पोलिसांच्या डोळ्यादेखत भरधाव धावतात. परंतु, पोलिस याकडे डोळेझाक करतात,असा आरोप नागरिकांनी केला आहे. परंतु यांनी दर महिन्यात काही ना काही हप्ते ठरवून घेतल्यामुळे हे असे प्रकार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाहतुकीलाशिस्त लावणारे पोलिस चौकाचौकांत गप्पा किंवा मोबाइलवर व्यस्त असतात. आपले काम टोईंग कर्मचाऱ्यांकडून करून घेत असल्यामुळे पोलिसांच्या कामचुकारपणामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.यावर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त कोणती ठोस कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे