Newsprahar

सामाजिक बांधिलकी जपत संपत फडके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

NEWS PRAHAR ( कानगाव ) ता. दौंड : दि : ०६ जानेवारी  :  नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा व दिनदर्शिका प्रकाशन आणि वितरण सोहळ्याचे आयोजन सिध्दीविनायक ग्रुपच्या अध्यक्षा सौ वर्षाताई फडके यांच्या वतीने विठ्ठल मंदिर कानगांव करण्यात आले होते.

मोठया भक्तिमय व उत्साही वातावरणात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला चौंरगीनाथ बाबा पालखी सोहळ्याचे महंत ह.भ.प. लक्ष्मण नाथजी महाराज यांच्या शुभहस्ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या यावेळी महाराजांनी भक्ती, सामाजिक ऐक्य, सदाचार व सकारात्मक जीवनमूल्यांचा संदेश दिला यावेळी माजी सरपंच डॉ. संपतराव फडके यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत आपुलकीचा संदेश पोहोचला व नववर्षाचे आणोखे स्वागत ग्रामस्थ, आणि उपस्थितानी अनुभवले यावेळी कानगांवचे माजी सरपंच नारायण फडके भीमा पाटसचे माजी संचालक महादेव चौधरी दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब कोह्राळे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रवक्ते भानुदास शिंदे पुणे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके अंकुश गवळी,सयाजी मोरे, रामदास पवार, दत्तात्रय फडके मोहन कोह्राळे रोहिदास कोलते हनुमंत कोह्राळे यासह असंख्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा सरपंच.

कानगांवचे माजी सरपंच संपत फडके यांनी कोरोना महामारी मध्ये रूग्णांना केलेली मदत, आठवडे बाजार, ग्रामपंचायत प्रकासकिय इमारत, व्यापारी गाळे, आरोग्य शिक्षण रस्ते पाणी वीज यावरील काम कौतुकास्पद असून त्यांच्या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत

मा.माऊली शेळके.
( जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा )