Newsprahar

सागर वाली कव्वाली शो दरम्यान कल्याणी नगर येथील बॉलर पब मध्ये दोन गटात राडा…

NEWS PRAHAR  ( पुणे ) :  पुण्यातील बॅालर पबमधील धक्कादायक व्हिडीओ हा न्युज प्रहारच्या हाती.या व्हिडिओ नंतर मोठी खळबळ निर्माण झाली. रात्री बारानंतरही हा पब सुरू असल्याचे कळतंय. रात्रीच्या वेळी पबमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ मारहाणीचा प्रकार घडलाय. या मारहाणीनंतर तीन ते चार जणांचे डोके फुटल्याची देखील माहिती आहे. पुण्यातील कल्याणी नगर रोड परिसरातील पबमध्ये हा प्रकार घडलाय. दोन गटांमघ्ये फ्रीस्टाईल मारहाण झाली. ज्यावेळी ही मारहाण झाली, त्यावेळी मोठी गर्दी पबमध्ये स्पष्ट दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर मधील बॅालर पबमध्ये हा प्रकार घडला आहे. रात्री 12 नंतर ही पब सुरू होता, त्यादरम्यानच ही घटना घडली गेली . पोलीस आयुक्तांच्या नियमावलीला पब मालकांची शून्य दाद दिल्याचे पहायला मिळतंय. पुण्यात रात्री उशीरापर्यंत पब सुरू असल्याचे सांगितले जातंय. आता पबमधील मारहाणीची घटना समोर आली मात्र, पबमध्ये दोन गटात मारहाण नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अजूनही कळू शकले नाहीये. व्हिडीओमध्ये काही तरूणी देखील दिसत आहेत. गाणे सुरू असतानाच अचानक मारहाण सुरू झाल्याचे पबमध्ये दिसत आहे. काही तरूण एकमेकांना मारताना दिसत आहेत.

मागील काही दिवसांपासून येवड्यात वाहने तोडफोड, जबरी चोऱ्या, हॉटेलमधील वादाच्या अश्या ऐक ना अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत कुठलाही गुन्हा अजून दाखल झालेला नाहीये. अशा प्रकारांकडे पोलिसाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येरवडा परिसरात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत असल्याचे समोर आले. आता हा पबमधील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. पोलिस यावर काही कारवाई करणार का?. हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.