Newsprahar

सरस्वती भूवन स्कूल पिपळे गुरवच्या ईशप्रीत कटारिया हिला मिळाले सुवर्णपदक…..

NEWS PRAHAR ( पुणे ) : रस्वती भूवन स्कूल पिपळे गुरवच्या ईशप्रीत कटारिया हिने सुवर्णपदक पटकावले पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे 02/09/2024 ते 04/09/2024 या कालावधीत पार पडल्या.

स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते श्री. गोपाल देवांग यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी श्रीमती अनिता केदारी, बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश काकडे, अध्यक्ष श्री रघुनाथ खेडेकर, सदस्य रमेश शेट्टी व मनोज यादव स्पर्धा प्रमुख क्रीडा पर्यवेक्षक श्री दीपक कन्हेरे उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती. सुनीता पालवे यांनी केले. खेळाडूंची शपथ श्री वाल्मीक पवार यांनी घेतली. श्री.राजेंद्र सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

ऋषिकेश वचकल श्रीमती कविता पाचारणे, दत्तात्रय मिसाळ, दिलीप धनवटे, प्रभाकर पाडाळे, हनुमंत पारखी,यांनी स्पर्धा संयोजनाचे कामकाज पाहिले.

सदर स्पर्धा 14, 17, 19 वर्ष मुले व 17, 19 वर्षे मुली या वयोगटात खेळविल्या गेल्या. या स्पर्धेत 145 शाळेतील 423 खेळाडूंनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. ईशप्रित कटारिया या खेळाडूंनी वजन गट 63 या वजन गटात 19 वर्षाखालील गटात सुवर्णपदक प्राप्त केले म्हणून सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव या स्कूलच्या वतीने तिचा भव्य असा सत्कार शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी सेक्रेटरी राजेश मनाकांत मुख्याध्यापिका सिमा काबळे यांनी केला व तिला पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा दिल्या ईशप्रित कटारिया यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेली आहेत तिच्या या यशा पाठीमागे तिचे वडील जितू कटारिया व आजोबा सुरेश कटारिया हे तिच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत व वडील जितू कटारिया हे तिला बॉक्सिंगचे धडे देत असून त्यांचं असं ठाम मत आहे की आजच्या काळात मुलींना या कलेशी अवगत असणे अतिशय गरजचे आहे त्यामुळे ते स्वतःच संरक्षण स्वतःच करू शकतातव आपला बचाव स्वतः करू शकतात.