सकाळी शेकडो विद्यार्थी शाळेकडे जाताना जुगार अड्ड्यांच्या सावटाखाली; पालक आणि नागरिक संतप्त…
NEWS PRAHAR ( पुणे ) : शिरूर तालुक्यातील शिक्रापुर शाळा परिसरात अवैध जुगाराचा वणवा उधळला जात आहे, आणि पोलिस प्रशासनाकडून अवघड नजर ठेवण्याऐवजी जुगार अड्ड्यांना गुप्तपणे आशीर्वाद मिळत असल्याचेच चित्र आहे. तळेगाव-शिक्रापुर रोडवरील हॉटेलच्या नावाखाली राजरोस सुरू असलेला जुगार अड्डा उच्च शिक्षण देणाऱ्या सहा शाळांच्या हाकेच्या अंतरावर असून, सकाळी ते दुपारपर्यंत शेकडो विद्यार्थी या परिसरातून ये-जा करतात.
पालकांचा संताप प्रचंड आहे. “शाळेजवळच जुगार चालत असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याला कोणतीही सुरक्षा नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. स्थानिक नागरिकांची बोलके टिप्पणी “जुगार अड्डे जोमात आहेत, पोलीसांचा आशीर्वाद असल्यामुळे प्रशासन निष्क्रिय आहे” प्रशासनाच्या गैरहजेरीचा थेट उलगडा करते.
शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापुर, तळेगाव ढमढेरे या गावांमध्ये अनेक जुगार अड्डे सक्रिय आहेत. बाहेर हॉटेलचा बोर्ड, आत जुगाराचा अड्डा हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे, आणि पोलीस अधिकारी या समस्येकडे डोळा झाकून बसलेले आहेत, जणू काय नियम कायदे फक्त कागदावरच अस्तित्वात आहेत.
सामाजिक संघटनांनी आणि पालकांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल व उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्याकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे आंबेगाव-शिरूरचे अध्यक्ष सतिश पाचंगे म्हणतात, “विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे ही समाजाची जबाबदारी आहे. शाळांच्या शेजारी चालणारा जुगाराचा अड्डा तेलंग साहेबांचा आशीर्वाद घेऊन जोमात. त्यामुळे येणाऱ्या पिढीच्या संस्कारांवर याचे पडसाद पडणार आहे.”
जागा मालक : संदीप भुजबळ व त्यांचे मित्र सागर महागाडे , माउली खरपुढे , अनंता सताव , हे सर्व मिळून १० / २० , २५ / ५० , १०० / २०० असे ५ ते ६ टेबल लावून जुगार खेळवत आहेत.
पालकांचा आणि नागरिकांचा आवाज स्पष्ट आहे – शाळा परिसरातील जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करा, नाहीतर येणाऱ्या पिढीचे भविष्य धोक्यात आहे.
