धंदाचालक मलई खाऊन मस्त, प्रशासन झोपेत मग्न; पोलिस अधीक्षक कारवाई करतील का याकडे नागरिकांचे लक्ष…
NEWS PRAHAR ( पुणे ) : चाकण शिक्रापुर बायपास मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून गॅस माफिया सक्रिय असून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात खुलेआम विक्री करीत आहेत. शिक्रापुर पोलिस स्टेशन परिसरात एका धाब्यातून मदन ,रोडे व देवा नावाचे राजस्थानी गॅस माफिया यांनी आपले बस्तान मांडले आहे.
शिक्रापुर येथील चाकण शिक्रापुर बायपास मार्गावर खालसा पंजाबी ढाबा आहे. या मध्यभागी पार्किंग आहे, आणि याच हॉटेलच्या परिसरातून अवैधरित्या ट्रक टॅबलेटमधून गॅस काढून थेट छोट्या-मोठ्या सिलिंडरमध्ये भरला जात आहे. हा काळाबाजार राजस्थानी गँगकडून सुरु असून राजरोसपणे रात्रीस खेळ चाले. राजस्थानी गँगने स्थानिक गुंडांना हाताशी धरून हा गोरख धंदा चालू ठेवला आहे. अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, चाकण-शिक्रापुर बायपास महामार्गाजवळच गॅस माफियाने गाव गुंडाच्या मदतीने व पोलीस प्रशासनाला चॅलेंज करत गॅस चोरीचा धंदा खुलेआम थाटला आहे.सुदैवाने अद्यापपर्यंत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. परंतु, भविष्यात गॅस गळती होऊन एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. गॅसच्या काळाबाजारामुळे परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित गॅस माफिया व त्याला मदत करणाऱ्या सर्वांवर लवकर कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कारवाई होणार का?
पंकज देशमुख साहेब यांच्याकडे पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षकाचा पदभार होता. त्यावेळी त्यांचा अवैध धंदेचालकांवर वचक होता. परंतु, देशमुख साहेबयांची पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती झाल्याने त्यांची बदली झाली, त्यांच्या जागी संदीपसिंह गिल साहेबयांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांनी डोके वर काढले. आतातर तक्रार करून देखील गॅस चोरीच्या रॅकेट वर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. स्वच्छ प्रतिमा व कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.