NEWS PRAHAR ( पुणे ): पुणे शहरातील वानवडी परीसरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. पुणे ऐतिहासिक शहर, सुसंस्कृत लोकांचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर हे हळूहळू स्पा रॅकेटचे केंद्र या नावाने ओळखले जात आहे. गेल्या २ वर्षांमध्ये शहरात घडलेल्या घडामोडी पाहता या अवैध धंद्यांवर पर्मनंट उपाय करणे गरजेचे झाले आहे. वानवडी परिसरामध्ये JEEVANDHARA PANCHKARMA CLINIC या ‘स्पा’ चालकाला कुणाचे ‘प्रोटेक्शन’ आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्पा सेंटर मध्ये पंचकर्म स्पा च्या नावाखाली अनेक मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. तसेच प्रामुख्याने पंचकर्म ’स्पा’ची सध्या चलती आहे. पर्यटन व्हिसावर आलेल्या विदेशी तरुणी व स्थानिक येथे काम करताना दिसून येतात. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या कारवाईचा मोर्चा ‘स्पा’च्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाकडे वळवला आहे. गुन्हे शाखेला त्यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्तांनी तर थेट, एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने कारवाई केली, तर संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणे दाराला जबाबदार धरले जाणार असल्याचे म्हटले आहे.
त्यानंतरही असे प्रकार वानवडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राजरोस सुरू असल्याचे दिसून येत आहेत.मात्र प्रोटेक्शन मनी घेऊन ‘स्पा’ चालकांना पाठीशी घालणारे रॅकेट कुणाच्या आशीर्वादाने कार्यरत आहे, हे देखील समोर येणे गरजेचे आहे. स्पा’मध्ये देहविक्रीचा धंदा सुरू आसल्याचे बोलले जाते. त्यामुळे ’स्पा’ सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्रीच्या धंद्याची पाळेमुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार कशी खोदून काढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी होवून ही स्पा सेंटर चालू आसल्याचे नागरीक सांगतात.