Newsprahar

वाघोलीत CAFE SUNSET मध्ये मिळणाऱ्या गुडगुडीला कोणाचे अभय….?

 

NEWS PRAHAR ( PUNE ) : राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातलेली असताना शासनाच्या आदेशाचे तीन तेरा वाजवून व कोणालाही न घाबरतां मालक आणि पोलीस यांच्या संगणमताने वाघोलीतील बकुरी फाटा येथील कॅफे सनसेट मध्ये हुक्का पार्लर सुरू आहे. हूक्का पार्लरमध्ये हुक्का हा तंबाखू ,निकोटीन,गांजा आणि इतर मादक पदार्थांनी भरलेला असतो. हुक्का पार्लरचे मालक सोशल मीडियाद्वारे विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडिया मार्फत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आकर्षित करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात अनेक ठिकाणी विशेषतः महाविद्यालय परिसरात हुक्का पार्लर हॉटेलमध्ये बेकायदेशीर चालवली जातात त्या ठिकाणी हुक्क्याच्या नावाखाली ड्रग्स गांजा तसेच अमली पदार्थ मुलांना दिले जातात. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. वाघोली मध्ये हा प्रकार सुरू असून अशा हुक्का पार्लरला वाघोली तसेच परिसरात परवानगी दिली आहे का? असा प्रश्न या परिसरातील स्थानिक नागरिक विचारत आहेत.

वाघोली हे जवळपास एक सिटी म्हणूनच नव्याने ओळखले जाऊ लागले आहे या परिसरात अनेक शैक्षणिक महाविद्यालय आहेत त्याच सोबत आयटी कंपन्या तसेच मेडिकल कॉलेज आहेत. अशाच ठिकाणी जर असे हुक्का पार्लर सुरू असतील तर तरुणाई नशे मध्ये जायला कितीकसा वेळ लागणार असे अनेक प्रश्न या परिसरातील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. 

इथे तर कुंपणच शेत खातंय या म्हणीनुसार हुक्का पार्लरमध्ये मूकसंमतीने अल्पवयीन मुलांचाही सहभाग असतो, त्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून हुक्का चालवणारे लहान मुलांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळ खेळत असल्याचा गंभीर आरोपही येथील नागरिकांनी केला आहे. नियमानुसार ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ जेवणाची सोय असते त्या ठिकाणी स्मोकिंग झोन असतो परंतु कॅफे सनसेट मध्ये असा कोणताही झोन नसल्यामुळे पोलिसांचा यांना आशीर्वाद आहे का? असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहेत?