Newsprahar

वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टतर्फे सन्मान सोहळा…

डॉ.बच्चुसिंग गुरुमुकसिंग टाक यांना मा श्री चंद्रकांत दादा पाटिल(उच्च तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.

NEWS PRAHAR ( पुणे ) : शहीद दिनाच्या निमित्ताने, वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, पुणे येथे एक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. समाजसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना या कार्यक्रमात पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात डॉ. बच्चुसिंग गुरुमुकसिंग टाक यांना “समाज गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. ते गेली ३० वर्षे व्यवस्थापन आणि विविध सामाजिक सेवांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक अपघातांमध्ये शेकडो लोकांचे प्राण वाचवले आणि हजारो मृतदेह बाहेर काढून कुटुंबियांना आणि पोलिस प्रशासनाला निस्वार्थ सेवा पुरवली. त्यांच्या या अतुलनीय समाजसेवेबद्दल त्यांना “समाज गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

सन्मान सोहळ्याचे प्रमुख अतिथी: मा श्री चंद्रकांत दादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) एअर मार्शल भूषण गोखले आमदार हेमंत रासने एबीपी न्यूज रिपोर्टर मंदार गोंजारी प्रसिद्ध अभिनेता ओम भुतकर (मुळशी पॅटर्न फेम – “राहुल्या”) प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे यानी डॉ.बच्चुसिंग गुरुमुकसिंग टाक यांना या मान्यवरांच्या हस्ते “समाज गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

या भव्य सोहळ्याचे आयोजन यशस्वीपणे पुढील व्यक्तींनी केले :

सचिन भारती शिवाजी जामगे (अध्यक्ष, वंदे मातरम संघटना, महाराष्ट्र प्रदेश) मोहित काकडे इतर सहकारी आणि सदस्य हा कार्यक्रम समाजसेवेला समर्पित असलेल्या व्यक्तींच्या सन्मानार्थ एक प्रेरणादायी सोहळा ठरला.