NEWS PRAHAR ( पुणे ) : आपण रेल्वेत तिकीट कलेक्टर असून तुमच्या कुटुंबातील दोघांना रेल्वेत नोकरी लाऊन देतो, असं खोटं आश्वासन देत महिलेने माजी सैनिकाला अधिकाऱ्याला १७ लाखांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगिता पाटणे, असं या महिलेचं नाव असून तिचा शोथ सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मीडिया रिपोर्टनुसार, सुरेश नाईक फसवणूक झालेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याचं नाव आहे. सुरेश नाईक हे २०२१ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रीशन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना इलेक्ट्रीकचं काम करण्यासाठी एका महिलेचा कॉल आला, तिने तिचं नाव संगिता पाटणे असं सांगितलं.
महिलेच्या कॉलनंतर सुरेश नाईक काम करण्यासाठी महिलेच्या वनवाडी येथील घरी गेले. त्यावेळी महिलेने त्यांना आपण रेल्वेत तिकीट कलेक्टर असल्याचं सांगितलं. सुरेश नाईक यांचा विश्वास संपादन करण्यासाठी महिलेने त्यांना तिचे आयकार्डही दाखवले. याशिवाय तुमच्या मुलींना रेल्वे नोकरी लावून देतो, असं आश्वासनही दिलं.