Newsprahar

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करून विकणाऱ्या ठिकाणी छापा…

NEWS PRAHAR { हडपसर } : पुणे शहरात अवैध बेकायदेशीर धंदे तसेच वाहतूक यांच्यावर परिणामकारक कारवाई करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांच्या आदेशानुसार काळेपडळ पोलिसांनी केली दमदार कारवाई , घरगुती गॅस सिलेंडर मधून रिफिलिंग करत असलेल्या चोरट्यास काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे पोलीस अंमलदार २०५४ काळभोर,८६४८ अतुल पंधरकर , पोलीस अंमलदार २४३, महादेव शिंदे, पोलीस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने एका इसमाला पकडले. सदर ठिकाणावरून ८० गॅस टाक्या वजन काटा ,गॅस ट्रान्सफर पाईप असा एकूण १,३०,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विक्रांत राजकुमार जाधव वय २२ वर्षे,रा. साईबाबा मंदिराजवळ, शोभा स्पर्श अपार्टमेंट ,फ्लॅट नं १०२ ससाणे नगर हडपसर असे चोरट्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार अतुल पंधरकर पेट्रोलिंग करत असताना सुत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली, एक जन घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस पाईपच्या साह्याने गॅस काढून तो लहान मोठ्या कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये भरत आहे या बातमीची खात्री करून पोलीसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी एका पत्र्याच्या गाळ्यामध्ये हा व्यवसाय चालवत होता . 

काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई डॉ.श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त ,परिमंडळ ५ मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,काळेपडळ पोलीस स्टेशन ,पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार २०५४, पोलीस अंमलदार ८६४८, अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार २४३ महादेव शिंदे ,पोलीस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली.