Newsprahar

फ्लॅट विक्री व्यवहारात ग्राहकाची ८ लाखांची फसवणूक; नारायणगाव मधील घटना…

NEWS PRAHAR ( जुन्नर ) : संजय किसन हांडे रा. उंब्रज, ता. जुन्नर ,जि. पुणे यांनी कुबेर पार्क फेज ३ या सोसायटीमधील फ्लॅट विक्रीचा व्यवहार यांचेच मित्र गजानन दांगट यांच्याशी १५ लाख रुपयांना ठरवून त्या मधील ७ लाख रुपयांचा चेक घेतला व दिनांक १५/९/२३ रोजी हा चेकचा व्यवहार पूर्ण झाला. मात्र, उर्वरित पैशांचा चेक म्हणजेच आठ लाख रुपयांचा व्यवहार पूर्ण झाला नाही.

यावरून दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर गजानन दांगट यांनी किसन हांडे यांना ४,५०,००० रुपयांचा दुसरा चेक दिला व त्यांच्याकडून त्याच रकमेचा हांडे यांच्या नावाचा चेक घेतला, त्यावेळी गजानन दांगट यांनी त्यांना सांगितले की माझा व्याजाचा व्यवसाय आहे माझ्याकडे ब्लॅक चे पैसे व्हाईट होतील. असा विश्वास संपादन करून त्यांनी हांडे यांच्याकडून ४,५०,००० रुपये किंमतीचा चेक घेतला व हांडे यांच्या खात्यावर रक्कम जमा होतात गजानन दांगट यांनी ती स्वतःच्या नावावरती पुन्हा काढून घेतली .

ही गोष्ट हांडे यांच्या लक्षात आल्यावर ती त्यांनी उर्वरित ८ लाख रुपयांची मागणी केली असता दांगट यांनी उडवा उडवी ची उत्तरे देण्यास सुरुवात केली .तेव्हा हांडे यांच्या लक्षात आले की आपली आर्थिक फसवणूक झाली आहे.

त्यानंतर किसन हांडे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर, ग्रामसेवक वारूळवाडी, कुबेर पार्क सोसायटी अध्यक्ष, राज्य विद्युत महावितरण नारायणगाव ,निबंध जुन्नर यांना सदरचे खरेदी खताला हरकत आहे म्हणून हरकत अर्ज दिले व वेळोवेळी नोटीस देखील पाठवल्या आहेत.

सदर फ्लॅट वरती लाल अर्बन बँक नारायणगाव यांनी कोणतीही चौकशी न करता सदर फ्लॅटवर कर्ज मंजूर केले आहे हे कर्ज मंजूर करत असताना बँकेने यावर ताबा कोणाचा आहे हे देखील पाहिले नाही किंवा बँकेचा कोणताही कर्मचारी यांनी येऊन चौकशी केली नाही.

हा फ्लॅट कोणाच्या मालकीचा आहे, सदर फ्लॅटवर किसन हांडे यांचाच ताबा आहे. गजानन दांगट यांनी किसन हांडे यांची तर फसवणूक केलीच आहे परंतु लाल अर्बन बँक नारायणगाव यांची सुद्धा फसवणूक केली आहे.