Newsprahar

फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई ; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला आंबेजोगाई जिल्हा बीड येथून अटक….

NEWS PRAHAR ( फुरसुंगी )  दि : १९ फेब्रुवारी  ​: फुरसुंगी पोलीस तपास पथकाने पळून जाऊन अस्तित्व लपवून राहणाऱ्या खुनाच्या आरोपातील आरोपीस आंबेजोगाई जि.बीड येथून ताब्यात घेतले. बरेच दिवसापासून हा आरोपी पोलिसांना चकवा देत वेशांतर करून राहत होता. त्यामुळे त्याला पकडणे आव्हानात्मक झाले होते परंतु आरोपी नामे किरण भैरू चव्हाण, रोहित भरत गायकवाड, सार्थक उर्फ गणेश संदीप डोळे यांना तपास पथकाने शीताफिने अटक केली होती.

परंतु यातील मुख्य आरोपी टिल्लू उर्फ विवेक अंगद मिसाळ व त्याचे आणखी साथीदार हे मिळून येत नव्हते फुरसुंगी पोलीस स्टेशनमधील तपास पथकाने गोपनीय बातमीचा आधार घेत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता तो आपले वास्तव्य सतत बदलत असल्याने मिळून येत नव्हता त्याचप्रमाणे नमूद पाहिजे आरोपीने त्याचा मोबाईल फोन बंद केल्याने त्याचा शोध घेऊन अटक करणे पोलिसांसमोर आव्हान होते.

परंतु तपास पथकाचे पोउपनि विनोद पवार व त्यांचे पथक टिल्लू उर्फ विवेक मिसाळ व त्याचे पाहिजे साथीदार यांचा कसून शोध घेत होते. तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारा मार्फत पाहिजे आरोपी विवेक मसाळ हा आंबेजोगाई परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे सदर बाब मा. वरिष्ठांचे निदर्शनास आणून त्यांचे परवानगीने पोउपोनि विनोद पवार व त्यांचे पथक तात्काळ आंबेजोगाई बीड येथे रवाना झाले व हा निष्णात आरोपी असल्याने तसेच त्याला पोलीस पथकाचा सुगावा लागेल व तो फरार होईल याची शक्यता होती तसा त्याने प्रयत्नही केला परंतु खबरदारी घेऊन आरोपीवर आंबेजोगाई बस स्टॉप परिसरात सापळा रचून त्याला शिताफिने झडप घालून ताब्यात घेतले.

सदर पाहिजे आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनांमध्ये पोलीस पथकाने कसोशीने तपास करून कुणाच्या गंभीर होण्यातील आरोपी यास अटक केले. सदरची कामगिरी या. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त परी – ६ पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग पुणे शहर, मा. अमोल मोरे, निरीक्षक फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री राजेश खांडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे )यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक विनोद पवार ,पोलिस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, हरिदास कदम, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजीत टिळेकर, नितीन सोनवणे ,योगेश गायकवाड, गणेश शिंदे सर्व नेमणूक फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी उत्कृष्ट व प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

घटनेचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

मुख्य घटना: ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता, आरोपींनी जुन्या वादातून २१ वर्षीय प्रसाद विरभद्र देवज्ञे याचे अपहरण करून त्याची हत्या केली होती.

अपहरणाचे ठिकाण :

परी सुपर मार्केट, संतोषीमाता कॉलनी, लेन नं. ३, ड्रीम्स आकृती, काळेपडळ, पुणे .

आरोपींची नावे :

किरण भैरु चव्हाण, टिल्लू मिसाळ, आदित्य देशमुख, रोहित गायकवाड, गणेश डोळे व इतर साथीदार  (१८ फेब्रुवारी २०२६): या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी आंबेजोगाई (जि. बीड) येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे .

गुन्ह्याचे स्वरूप :

आरोपींनी प्रसादला बांबूने मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवून नेले आणि संकेत विहार येथील गणपती मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात दगड व लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचा खून केला .फुरसुंगी पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणातील काही आरोपींना ताब्यात घेतले होते आणि उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू होता, ज्यापैकी एकाला आता बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे