Newsprahar

पोलीस आयुक्तांनी कलेक्टरांची शाळा भरवून देखील काही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे मसाज पार्लरच्या नावाखाली कोरेगाव पार्क येथे वेश्या व्यवसाय सुरूच….

कोरेगावपार्क , चंदननगर , विमानतळ , येरवडा , वानवडी , हडपसर , सिंहगड रोड ,कोंढवा , भारती विद्यापीठ  व इतर  पोलीस स्टेशन च्या हद्दीतील मसाज पार्लर च्या नावाखाली चाललेला वेश्या व्यवसायावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर कोणती कारवाई करतील याकडे पुण्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे…

पुण्यातील मसाज पार्लर च्या प्रत्येक लेआउट मागे स्थानिक पोलीस स्टेशनची ५०,००० हजार रुपयांची मागणी…

NEWS PRAHAR  ( सुचिता भोसले ) पुणे : – देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यात अनेक आयुर्वेदिक मसाज पार्लरमध्ये गैरकारभार सुरु आहेत. मसाज सेंटर आणि स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायांचे प्रकार उघड झाल्यानंतर आता आंतराराष्ट्रीय पातळीवर होणारा ऑनलाइन वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेने उघड केला आहे.तरी ही पुणे परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली जो वेश्या व्यवसाय पुणे शहरात चालू आहे त्या पासुन पुण्याची सुटका होईल का? पोलिस रेकॉर्डवरील अमली पदार्थ तस्कर, जुगार आणि मटक्यासह विविध प्रकारचे बेकायदेशीर धंदे सुरू ठेवले, तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांना दिला आहे.

पण पोलीस आयुक्तांना पुण्यातील मसाज सेंटर च्या आतुन चालणारे वेश्या व्यवसाय करणारे बडे मासे अद्यापही दिसले नाहीत का? अशा प्रकारची शंका पुण्यातील कोरेगाव पार्क येथील नागरीकांना आहे.शहरातील बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर धोरण स्वीकारले आहे. हे धंदे चालविणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता.

न्यूज प्रहार च्या हाती लागली पुण्यातील मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या  व्यवसायाची यादी…

 

तरी देखील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत मसाज पार्लर मध्ये वेश्या व्यवसाय तसेच, गांजा विक्री ,गोवा गुटखा विक्री मसाज पार्लर सर्रासपणे नियम धाब्यावर बसून सुरू आहे. वेळोवेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना कल्पना देऊनही पोलीस अधिकारी कोणतेही कारवाई करत नाहीत .उलट आमच्या हद्दीत काहीच सुरू नाही, असे वरिष्ठ आधिकारी नागरिकांना सांगतात .

नागरिकांना दिसते परंतु या कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मधल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना दिसत नाही का? अशी परिस्थिती सध्या कोरेगाव पार्क परिसरात दिसून येत आहे. कोरेगाव पार्क परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय असे ऐक ना अनेक अवैध धंदे कोरेगाव पार्कमध्ये सुरू आहेत. परंतु तक्रार केल्यावर ते तक्रारदारालाच तू खोटी तक्रार करतो अशा प्रकारे धमकावण्यात येते .त्यामुळे सुजान नागरिक तक्रार करण्यास सुद्धा घाबरत आहेत. याचाच अर्थ असा की या पोलीस स्टेशनच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे अवैध मसाज पार्लर चे धंदे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहेत का ?

यासोबतच या पोलीस स्टेशनमध्ये मसाज कामगार व पार्लरवर गुन्हे दाखल होवून ही पुन्हा अशा गुन्हेगारी करणाऱ्याला हे पोलीस स्टेशन अभय देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांना विविध मार्गाने त्रास देण्याचे काम करत आहेत. पोलिसात जनतेचे संरक्षण करते आहेत परंतु ते जनता सोडून अवैध धंदेवाल्यांना मदत करत असल्याचे चित्र कोरेगाव पार्क परिसरात दिसून येत आहे त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला या पोलीस स्टेशन ने सरळ सरळ केराची टोपली दाखवली आहे की काय ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.या पोलीस स्टेशन परिसरातील अवैध्य मसाज पार्लर व्यवसायावर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

  • कोरेगाव पार्कचे  वरिष्ठ कोणाला घाबरत नसल्याचे चित्र…