NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात मागील काही दिवसांपासुन अनेक स्पा सेंटरमधील महिलांना त्रास देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाखो रुपयांची माया जमवत धुडगूस घातला होता.अखेर त्या कार्यकर्त्यांवर तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याई नगर क्लासिक हाईट तिसरा मजला धनकवडी या आयुर्वेदिक स्पा चालक महिलेकडे २०,००० रूपये व शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी तीन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून तीघांना अटक केली आहे,व त्यांचे आणखी दोन साथीदार हे फरार आहेत.
खंडणीचा आरोप प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रोहित गुरुदत्त वाघमारे वय 29 वर्ष राहणार उत्तम नगर, शुभम चांगदेव धनवटे वय 20 वर्ष, राहुल ज्ञानेश्वर वाघमारे वय 36 राहणार पौड रोड कोथरूड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत .यातील आरोपींचे इतर दोन मित्र हे फरार आहेत.
तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याई नगर क्लासिक हाईट तिसरा मजला धनकवडी पुणे या ठिकाणी वरील आरोपींनी या स्पा मध्ये काम करणाऱ्या महिलेला तुझा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देवून मारहाण करत शिवीगाळ केली आहे. त्यावेळेस आम्हाला तू २०,००० रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली परंतु महिलेने माझ्याकडे पैसे नाही असे सांगितले तर तू कुठूनही पैसे आण आणि आम्हाला पैसे दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली .
त्यावेळी महिलेकडे पैसे नव्हते त्यामुळे वरील आरोपींनी त्या महिलेस मारहाण केली व तेथील काऊंटर मधून ८०० रुपये घेऊन ते जाताना असे म्हणाले की , पोलिसात गेली तर मी पोलिसांना घाबरत नाही मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तू जर मी सांगतोय तसे नाही केले तर मी हे तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेल आणि तुझ्या घरी येऊन माहिती सांगेल अशा धमक्या देऊन त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. खंडणी सोबत शरीर सुखाच्या मागणी तसेच धमक्या देणे असे आरोप संबंधित महिलेने केले आहे .
या आधी सुद्धा या आरोपींनी अनेक स्पा सेंटर वरती जाऊन तुमच्या स्पा सेंटर मध्ये स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जातो .या प्रकारचे पुरावे आमच्याकडे आहेत असे म्हणून अनेकच स्पा सेंटर मधून अनेक मुलींना छेडछाड करत व त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या आरोपींनी खंडणी उकळली आहे. तरी संबंधित आरोपींनी ज्यांना त्रास दिला आहे अशा सर्वांनी यांच्या विरोधात समोर येऊन गुन्हे दाखल करावे अशी विनंती सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केली आहे.