Newsprahar

पुण्यातील स्वारगेट येथील “Vegan Vibe”हुक्काबार जोमात सुरु नागरिक हैराण,सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा…

पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई कधी….

NEWS PRAHAR  ( पुणे ) – राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे व पुणे पोलिस आयुक्तांनी सर्व हुक्का पार्लर बंद करण्याचा आदेश दिलेले असताना सुद्धा स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील ” Vegan Vibe” या हॅाटेलच्या टेरेस वरती बेकादेशीर हुक्का पार्लर पहाटे पर्यंत चालू असते .

तेहि स्वारगेट पोलिसांच्या नाकावर टिच्चून उघडपणे हा प्रकार चालू आहे. मुंबईतील एका पबमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईसह राज्यातील हुक्का पार्लरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर २०१८ मध्ये राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदीचा निर्णय घेतला. ही बंदी लागू केल्याबाबतची अधिसूचना गृहविभागाने काढली. त्यानुसार ‘सिगारेट व तंबाखू अशा प्रकारामुळे महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या कुटुंबातील मुलांवर गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.पुणे शहरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ‘हुक्का पार्लर’मध्ये दिल्या जाणाऱ्या हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सर्वश्रृत आहे. या गांजामुळेच बहुतांश पार्लरमध्ये युवक गर्दी करत असतात, हेही जग जाहिर आहे.

हॅाटेल्स, बार व पब मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्का पार्ट्यां व त्यामुळे उद्भवणारी समस्या रोकण्यासाठी कायदा सुव्यवस्था गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत “Vegan Vibe”कारवाई होणार का? सर्व हु्क्का पार्लर माफियांचा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून स्थानिक यंत्रणेला “अर्थपूर्ण” पद्धतीने सोबत घेऊन चालत असल्यानेच स्वारगेट परीसरात हा हुक्का पार्लर व्यवसाय पहाटे पर्यंत तेजीने व बेधडक सुरु असल्याचे लोकांमध्ये खुलेआम चर्चिले जात आहे.तर पोलीस प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यात येणार का? तसेच मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना हुक्का पार्लर पासुन दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक अपेक्षा बाळगून आहेत.

वसुली बहाद्दर करताहेत दरमहा लाखोंची वसुली …….

हुक्का पार्लर व्यावसायिकांना स्थानिक पोलिस, गुन्हे अन्वेषण विभाग किंवा इतर विशेष पथकाचा छापा पडणार नाही याची खात्री असल्याने या परिसरात संगनमताने अवैध हुक्का पार्लर व्यवसायांचा जम बसवण्यात आला आहे. दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायाने पोलिसांना हाताशी घेऊन व्यावसायिकांनी देवाण घेवाण वाढवून आपली छाप बनवली आहे या व्यावसायिकांना प्रशासनाची कोणतीच भीती राहिली नसून पोलिसांशी लागेबांधे करून हुक्का व्यवसाय जोरात सुरु आहे की काय, अशी नागरीकांन मध्ये जोरात चर्चा सुरू आहे.