Newsprahar

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत ; पोलिसांकडून सोशल मीडिया अंकाउंटची तपासणी…

NEWS PRAHAR : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत सापडला आहे. पुणे पोलिसांनी गजा मारणेसह आणखी एका साथीदाराची तब्बल चार तास चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. आता एक गुन्ह्यामुळे नाही तर रिल्समुळे गजा मारणेला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं आहे. गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे पुन्हा गोत्यात अडकला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे. या अंकाउंटवरून तो रिल्स बनवून अपलोड करतो. मात्र गजा मारणेचे हे रिल्स करमणुकीसाठी नसून दहशत पसरवण्याचे काम करतात. तसेच त्याच्या या व्हिडिओचा तरुण पिढीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली आहे. GM boys या नावाने गजा मारणेचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. या अकाउंटवर गजानन मारणेचे साथीदार गजानन मारणेचा उल्लेख डॉन, भाई असा करतात. तसेच दहशत निर्माण करणारे रिल्स टाकतात.

दरम्यान गजा मारणेच्या दहशतीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याला बोलवून घेत चौकशी केली आहे. गजानन मारणे टीपू पठाण नावाच्या साथीदाराच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर रिल्स बनवतो. तसेच शेअर करतो. त्यामुळे गजा मारणेसोबत त्याचा साथीदार टीपू पठाणलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचीही चौकशी करण्यात आली आहे. तसेच सोशल मिडिया अकाउंटचाही तपास केला गेला आहे. यानंतर असं व्हिडिओ न बनवण्याची समज त्यांना पोलिसांनी दिली आहे. तसेच या दोघांवरही आता पुणे पोलिसांची करडी नजर आहे.