न्यूज प्रहार ( पुणे ) : पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळबंली असून वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा लागल्या आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी वाजता झाला.
उरुळी कांचन, येथील अत्यंत गजबजलेल्या तळवडी चौकात कंटेनर व एका ट्रकचा अपघात झाला आहे. आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय कामठे, मनोज मोहोड, अश्वजीत रत्नपारखे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा कंटेनर हा तळवडी चौकातून शिंदवणे रोडकडे वळत होता. यावेळी सोलापूर च्या बाजूने आलेल्या ट्रक ने कंटेनर ला जोरदार धडक दिली. यावेळी दोन्ही वाहने रस्त्यावर पडली.