अंमली पदार्थ नियंत्रण विभाग १ सहकार नगर परिसरातील गांजा विक्रीवर कारवाई करण्यास जाणून बुजून करतंय टाळाटाळ…!
NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे : सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्रीला पोलीसच प्रोत्साहन देत आहेत की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे .वारंवार तक्रारी करूनही सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांजा विक्री बंद होत नाही. याबाबत नार्को पथक -१ हे तर जाणून-बुजून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे की काय? असा प्रश्न या परिसरातील नागरिक करत आहेत.
अमली पदार्थ विक्रीला बंदी असताना सुद्धा पुण्याच्या सहकार नगर परिसरामध्ये सौरभ कट्टीमनी उर्फ पाटील हा आपल्या कामगाराला म्हाणजे ( डोंगा ) याला सोबत घेऊन अगदी सराईत पणे गांजा विक्री करताना दिसत आहे. याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असून सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत. पत्रकारांनी बातम्या केल्या म्हणून पत्रकारांनाच खोट्या खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये घेण्याच्या धमक्या देत आहेत.
आता तर या गांजा विक्रीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप “न्यूज प्रहारच्या” हाती लागली आहे. यावर पुण्याचे पोलीस आयुक्त कोणती कारवाई करतात असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त हे गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र या गांजा विक्रीमुळे समोर येत असल्याची चर्चा सुद्धा या परिसरात जोरदारपणे सुरू आहे.